आर आर पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत कल्याण तालुक्यातील काकडपाडा ग्रामपंचायतीची निवड, कष्टाचे फळ !!
कल्याण (संजय कांबळे) : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे वतीने आयोजित कै आर आर (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धा अभियानांतर्गत कल्याण तालुक्यातील काकडपाडा ग्रामपंचायतीने पहिला क्रमांक पटकावला असून जिल्ह्य़ातून भिंवडी तालुक्यातील चिंचवली (खाडपे) या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
यामागे या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक त्यांना वेळोवेळी मदत करणारे विस्तार अधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचे हे कष्टाचे फळ आहे.
शासनाने जाहीर केलेल्या कोणत्याही योजना किंवा एखादे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण पंचायत समिती, आणि येथील अधिकारी व कर्मचारी होय. त्याचप्रमाणे यांना समर्थपणे पाठिंबा किंवा पाठबळ देणारे लोकप्रतिनिधी हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सुदैवाने कल्याण तालुक्याला झेडपी अध्यक्ष पद व शेजारील मुरबाड तालुक्याला उपाध्यक्ष पद मिळाले आहे. झेडपी अध्यक्षा श्रीमती सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिसोदिया मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रकात पवार गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांचे मार्गदर्शन तर विस्तार अधिकारी व्ही आर चव्हाण, पी बी हरड विशाखा परटोळे, ग्रामसेवक एम जी कोकणे, विलास मिरकुटे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बाळा गायकर, इतर सर्व पदाधिकारी व सदस्य या सर्वांचेच प्रत्यक्षात काम यामुळेच मागिल वर्षी म्हणजे सन २०१८/१९ मध्ये कल्याण तालुक्यातील बापसई ग्रामपंचायत जिल्ह्य़ातून स्मार्ट ग्राम म्हणून पहिली आली तर तालुका पातळीवरील भिवंडी मधील चिंचवली (कुंदे) मुरबाड शिरोशी, अंबरनाथ ढवळे कुडसावरे, तर शहापूर तालुक्यातील ठुणे ग्रामपंचायतीचा पहिला क्रमांक पटकाविला.
या वर्षी म्हणजे सन २०१९/२० मध्ये शासनाच्या आर आर (आबा) पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत स्पर्धा अभियानात गाव तपासणी साठी आर आर (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धा तपासणी पथक जिल्ह्य़ातून ११ फेब्रुवारी रोजी कल्याण तालुक्यात आले होते. यामध्ये कार्यकारी अभियंता, बांधकाम, पाणीपुरवठा, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, अतिरिक्त आरोग्य अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रकांत पवार यांचा समावेश होता. यावेळी या स्पर्धेचे निकष एस (स्वच्छता) एम (मॅनेजमेंट) ऐ (दायित्व) आर (अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण) टी (पारदर्शक व तंत्रज्ञान) आदींची तपासणी करण्यात आली. यावेळी कल्याण तालुक्यातील काकडपाडा या १ हजार ते अकराशे लोकवस्ती असलेल्या या ग्रामपंचायतीचा तालुका पातळीवरील पहिला क्रमांक मिळविला. या करीता या ग्रामपंचायतीला १० लाखांचे बक्षीस मिळाले आहे. यासाठी कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांचे मार्गदर्शन लोकप्रतिनिधी, सभापती, उपसभापती सदस्य यांची साथ तर विस्तार अधिकारी व्ही आर चव्हाण, पी बी हरड यांचे प्रत्यक्ष कृतीतून मदत व सहकार्य, तसेच गावचे सरपंच प्रवीण हरिश्चंद्र चौधरी, उपसरपंच संदिप नारायण चौधरी व सर्व सदस्य यांच्या कष्टाचे हे फळ आहे.
याबरोबरच यावर्षी भिवंडी तालुक्यातील चिंचवली (खाडपे) मुरबाड मधील वैशाखरे, शहापूर मधील दळखण, अंबरनाथ मधील नेवाळी ग्रामपंचायती तालुक्यात पहिल्या आल्या आहेत. तर जिल्हायातून चिंचवली (खाडपे) ही भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे.
आज कै आर आर (आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील मागील वर्षी जिल्हय़ातून पहिल्या आलेल्या बापसई आणि तालुक्यातून पहिला क्रमांक मिळविलेल्या काकडपाडा यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. हा मान तालुक्याला दोनदा मिळाला असून हे कल्याण तालुक्यातील नागरिकांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे.


No comments:
Post a Comment