पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे यांचे कडून एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस चे पत्रकार संजय कांबळे यांचे कौतुक!
कल्याण, (संजय कांबळे) : अंत्यत खडतर परिस्थितीतून मार्ग काढत शिक्षण पूर्ण करून कल्याण, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ आदी तालुक्यातील ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून चमकण्याची संधी उपलब्ध करून देणा-या पत्रकार संजय कांबळे यांचे पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे यांनी कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते मराठी गाण्यांच्या अल्बम च्या पोस्टर चे अनावरण करण्यात आले.
कल्याण तालुक्यातील आपटी गावचे सुपूत्र डॉ रविंद्र शिसवे यांचे संजय कांबळे हे बालमित्र असून त्यांचे बालपण आपटी गावातच गेले, दिनेश शिसवे, आपा शिसवे, भास्कर शिसवे, भाऊ शिसवे, आणि आताचे सहपोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे हे यांचे बालमित्र होय. अंत्यत अडचणीच्या काळात या सर्वांनी मदत केल्याने संजय कांबळे आपले शिक्षण पूर्ण करु शकले. पुढे रविद्र शिसवे हे डाॅक्टर झाले व यानंतर आयपीएस अधिकारी.
तर कांबळे पत्रकारितेकडे वळले. गेली २०/३० वर्षे पत्रकारिता करत असताना अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक शैक्षणिक कामात लोकांना मदत केली. याची माहिती डॉ रविंद्र शिसवे यांचे पर्यंत कोणाच्या तरी माध्यमातून पोहचत होती. परंतू आपल्या कल्याण, मुरबाड, शहापूर अंबरनाथ आदी तालुक्यातील ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या नावाची संस्था स्थापन करून त्यायोगे या कलाकारांना मराठी हिंदी चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभिनेते, अभिनेत्री यांची भेट घडवून त्यांचेपासून प्रेरणा, मार्गदर्शन घेऊन काही मराठी गाणी रेकॉर्डिंग व त्यावर या नवोदित कलाकारांना घेऊन विडिओ शुट केले होते. सध्या ही गाणी पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्य़ातील विविध टिव्ही चॅनल वर गाजत वाजत आहेत.
याच निमित्ताने तसेच सहपोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे यांना प्रशासकीय कामात उत्कट सेवा केल्याबद्दल भारताचे राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पत्रकार संजय कांबळे हे सहकुटुंब डॉ रविंद्र शिसवे यांच्या निवासस्थानी व पुणे पोलीस कमिशनर कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांच्या हस्ते मराठी गाण्यांच्या अल्बमचं पोस्टरचे अनावरण करण्यात आले. जेव्हा त्यांना या प्रोजेक्ट बदल माहिती दिली तेव्हा त्यांनी टिम प्रमुख संजय कांबळे यांचे विशेष कौतुक केले. व पाठिवर" शाब्बास " अशी थाप मारली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी 'साहेबांच्या' मातोश्री श्रीमती शुंभागी अंनता शिसवे, वडील अंनता शिसवे यांनी देखील कामांचे कौतुक केले. यावेळी पत्रकार संजय कांबळे यांच्या पत्नी सौ शितल कांबळे, मुलगा आन्शू कांबळे, बालकलाकार हिंमाशू कांबळे, कोरिओग्राफ आकाश सोरटे उपस्थित होते.


No comments:
Post a Comment