Thursday, 4 February 2021

पोटधरून हसवणारा अभिनेता सागर कांरडे कल्याण करांना अंतर्मुख करायला लावणार 'इशारो इशारोंमे'!

पोटधरून हसवणारा अभिनेता सागर कांरडे कल्याण करांना अंतर्मुख करायला लावणार 'इशारो इशारोंमे'!


कल्याण (संजय कांबळे) :@ काही नावे समोर येताच पोटधरून हसायला होते. त्यातच झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो चला हवा येवू द्या मधून विनोदी अभिनेता म्हणून घराघरात पोहोचलेला, आपल्या सहज सुंदर शब्द फेक व बाॅडी लाॅगवेज ने लोकांना पोटधरून हसवणारा अभिनेता सागर कांरडे आता मात्र हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणार आहे, तेही 'इशारो इशारोंमे, या नाटकातून कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात येत्या रविवारी!
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय चला हवा येवू द्या या शोमधून विनोद वीर म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कांरडे हा आपल्या सहज सुंदर अभिनय आणि अचूक टाईमिंग साधत शब्द फेक यामुळे निर्माण होणारा विनोद आणि त्याला मिळणारा उंदड प्रतिसाद, खळखळून पोटधरून हसवणारा कलारसिक दिसला म्हणजे तीच त्या अभिनेत्यासाठी पोहच पावती मानली जाते. त्यामुळे अभिनेता सागर कांरडे यांचा एक वेगळा रसिक प्रेक्षक वर्ग समाजात निर्माण झाला आहे. तो आहे म्हणजे विनोद आलाच अशी काहीशी प्रतिमा त्यांची निर्माण झाली असून विनोदी अभिनेता म्हणून तो  परिचित आहे
मात्र या पारंपारिक प्रतिमेला बगल देत इशारो इशारोंमे या वेगळ्या ढंगाच्या हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणा-या नाटकांमधून सागर कांरडे कलारसिकासमोर येत आहे. नवरा बायकोचं एकमेकांवर निस्सीम प्रेम आहे उभयतांचा संसार छान, सुखाचा चालू आहे. त्याच्यात काही प्राॅब्लेम्स नाही. असं असताना यांना घटस्फोट हवा असेल तर? तुम्ही काय म्हणाल? अतिशय सुंदर कथानक असलेले हे इशारों इशारोंमे नाटक सुरुवातीला हसवता हसवता गंभीरतेकडे वळते व अंतर्मुख करायला लावते.
सई एण्टरटेन्मेंट प्रस्तुत सरगम क्रिएशन निर्मित इशारो इशारोंमे हे नाटकाची मुळ संकल्पना जय कापडिया यांची असून सहिंतेतल नाटक अचूक हेरल आहे आणि प्रयोगात ते केंद्रस्थानी राहिल यांची दिग्दर्शन करताना पुरेपूर काळजी घेतली आहे. कौन्सिलचे आॅफिस, कॅफे शाॅप आणि संजयचे घर अशी लवचिक नेपथ्य रचना अजय पुजारे यांनी योजली आहे राहूल रानडे यांनी संगीतातून नाटकात अपेक्षित सरगम आणली आहे. गुरु ठाकुर यांच्या रचनेला गायक अवधूत गुप्ते आणि शाल्मली सुखटणकर यांनी रंगत आणली आहे. ईशा कापडिया (वेशभूषा) व राजेश परब (रंगभूषा) यांनी आपली कामे चोख केली आहेत.
निर्माता अजय कासुर्डे यांच्या इशारो इशारोंमे मध्ये सागर कांरडे यांनी ब-याच कालावधीनंतर आपल्यातील संवेदनशील अभिनेत्याला आव्हान देणारी भूमिका यात साकारली आहे. त्याच्या बरोबर संजना हिंदुपूर, उमेश जगताप, शशिकांत गंगावणे, प्रिती भरडिया यांनी ही आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आचार्य अत्रे नाट्यगृह मार्च २०२० रोजी बंद करण्यात आले होते. ते आता ११डिंसेबर २०२० ला उघडण्यात आले. इतक्या कालावधीनंतर या नाट्य गृहात पोटधरून हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणारा तेही 'इशारो इशारोंमे' येत्या रविवारी ७ फेब्रुवारी ला येत आहे. एक वेगळा अनुभव देणारा आणि या नाटकाला प्रेक्षकांची मिळणारी पंसती, ठाणे, वाशी, पार्ले डोंबिवली येथील प्रेक्षकांचा चढता आलेख पाहता कल्याण करांनीही हे नाटक एकदा पाह्यला हवे ऐवढे नक्की! 

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...