नाका बांधकाम,कामगारांना स्मार्ट कार्डाचे वितरण !
कल्याण, प्रतिनिधी : असंघटीत कष्टकरी कामगार संघटना, आयोजित अधिकार बैठकीत शेकडो नाका बांधकाम,कामगारां महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्यात आले आहेत...
नाका व बांधकाम कामगारांची 1996 च्या कायद्या अंतर्गत नोंदणी तात्काळ व्हावी... नोंदणीकृत कामगारांना योजना चा लाभ मिळावा.आणि एकूणच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीला घेऊन संघटना मागील 10 वर्षांपासून काम करत आहे... आज आपण उल्हासनगर प्रभाग समिती म्हरळगांव ग्रामपंचायत तें कामगार कल्याण आयुक्त कार्यालय ता कल्याण जिल्हा ठाणे यांच्या सोबत पाठपुरावा करून कामगारांना स्मार्ट कार्ड मिळवून दिले आहेत हा नाका कामगारांच्या एकजूट संघर्षाचा विजय आहे... मात्र एवढं काम पूरेस नाही तर जो पर्यंत शेवटच्या नाका बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्याला सुविधा मिळत नाही तो पर्यंत संघटना काम करत राहणार आहे...अशी माहिती असंघटीत कष्टकरी कामगार संघटनेचे सुनील अहिरे यांनी दिली.

No comments:
Post a Comment