Wednesday, 17 February 2021

केडीएमसीत कोरोनाची दुपटीने वाढ : कोरोनाची मंगळवारी ५४ रुग्ण सापडले तर बुधवारी १२८ रुग्णाची नोंद .....

केडीएमसीत कोरोनाची दुपटीने वाढ :

कोरोनाची मंगळवारी ५४ रुग्ण सापडले तर बुधवारी १२८ रुग्णाची नोंद .....


कल्याण  :- राज्यातील काही जिल्ह्या सह मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा आपली विषवल्ली पसरवायला सुरुवात केल्याने त्याची झळ आता कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही हळुहळु पसरायला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवली शहरात मंगळवारी कोरोनाची ५४ रुग्ण सापडल्या नंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी  दुपटीने १२८ कोरोना रुग्ण सापडल्याची नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागा दिल्याने  मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातही कोरोना रुग्णाची संख्या वाढायला लागली असल्याने वाढती कोरोना बाधित रुगणाचा संख्याही चिंतेची बाब बनली आहे .
कल्याण पूर्व - १५ ,कल्याण पश्चिम - ५० ,डोंबिवली पूर्व - ४४, डोंबिवली पश्चिम- १३ ,मांडा टिटवाळा-३, मोहने-३

कल्याण पश्चिम हॉट स्पॉट च्या दिशेने आगेकूच ..

कल्याण पश्चिम परिसर हा बहुतांश दाटीवाटी चा गत वर्षी कोरोनाच्या पादुर्भावाच्या संसर्गाच्या कालावधीत सर्वात जास्त कोरोना रुग्ण कल्याण पश्चिमे कडील काही भागात सापडल्याने कल्याण पश्चिम परिसर कोरोनाचा हॉट स्पॉट बनला होता बुधवारी सापडलेल्या कोरोनाच्या १२८ रुग्णाला पैकी ५० रुग्ण कल्याण पश्चिम परिसरात सापडल्याने पुन्हा एकदा कल्याण पश्चिम परिसर  हॉट स्पॉट च्या दिशेने आगेकूच  करीत असताना दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...