Wednesday, 17 February 2021

भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचा अतिंम विजेता ठरला गोरस ई संघ, वरप येथे भव्य बक्षीस वितरण सोहळा !

भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचा अतिंम विजेता ठरला गोरस ई संघ, वरप येथे भव्य बक्षीस वितरण सोहळा !


कल्याण (संजय कांबळे) : स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठांन आयोजित स्व अनिकेत अजित पाटील व स्व रोहितभाई भोईर चषक २०२१ भव्य ओव्हर आर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन वरप येथील सीमा रिसार्ट या मैदानावर करण्यात आले होते. आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम सामन्यात गोरसई संघ विजयी ठरला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख ७१ हजार रुपये व भव्य ट्राफी विजेत्या संघाला देण्यात आली.


आर बी इलेव्हन क्रिकेट संघ वरप चे राज भोईर, योगेश भोईर, रोशन भोईर आणि प्रंशात रेड्डी यांनी स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान या बॅनर खाली स्व अनिकेत अजित पाटील व रोहित भोईर चषक २०२१ भव्य ओव्हर आर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. गेली ४ दिवस सीमा रिसार्ट येथील प्रशस्त मैदानावर हे क्रिकेट सामने खेळवले जात होते. एकूण ३२ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते आजच्या शेवटच्या दिवशी निंबवली विरुद्ध गोरसई हा अंतिम सामना खेळविण्यात आला. यावेळी निंबवली संघाने पहिली फलंदाजी करताना ४० धावांचे लक्ष्य घोटसई संघासमोर ठेवले होते. ते गोरसई संघाने सहज पुर्ण केले आणि अंतिम सामना जिंकला. यावेळी पंच म्हणून सुभाष पाटील, मुन्ना पठाण, सुनील माने व निरजंन सांवत यांनी काम पाहिले तर सामान्यांचे समालोचन रोशन संते सोनू बांगर यांनी केले. यासामन्यात मॅन आॅफ द मॅच सुरेश केणे, बेस्टफिल्डर विकी, उत्कृष्ट गोलंदाज अशोक दिंडा, तर उत्कृष्ट फलंदाज महेंद्र केणे यांना घोषित करण्यात आले. तर सामनावीर म्हणून गोरसई संघाचा सुरज केणे याने किताब पटकावला. उपविजेता संघ निंबवली यांना देखील भव्य ट्राफी देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अतिंम विजेते ठरलेल्या गोरसई क्रिकेट संघाला भव्य दिव्य ट्राफी व रोख ७१ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर दिलीप भोईर, रमेश भोईर, राजेश भोईर, मनसेचे तालुका अध्यक्ष अश्विन भोईर, विवेक गंभीरराव, अजित पाटील, किशोर वाडेकर, पत्रकार संजय कांबळे, महेश भोईर, हनुमान भोईर, आदी मान्यवर उपस्थित होते तर गेले ४ दिवस या सामन्याचे उत्कृष्ट नियोजन राज भोईर, योगेश भोईर, रोशन भोईर व प्रशांत रेड्डी यांनी केले होते, शेवटच्या दिवशी मैदानावर क्रिकेट प्रेमींनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. तर पुढच्या वर्षी रोख बक्षीस रुपये एक लाखांचे असेल असे आयोजकांनी यावेळी घोषित केले.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...