Thursday, 18 February 2021

झेडपी अध्यक्षांनी कल्याण पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर साजरा केला 'हळदीकुंकू'!

झेडपी अध्यक्षांनी कल्याण पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर साजरा केला 'हळदीकुंकू'!


कल्याण (संजय कांबळे) : शासकीय काम काजातून थोडा वेळ काढून या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी तसेच त्यांच्यातील सुफ्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सुषमा लोणे या कल्याण पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या.


कल्याण पंचायत समिती मध्ये १०/१२ विभाग  आहेत. यामध्ये ८० ते ९० कर्मचारी काम करत आहेत. पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, कृषी, बालविकास, पशुसंवर्धन, बांधकाम, एस बी एम, ग्रामपंचायत, लेखाविभाग, आदींचा समावेश आहे. एक काळ असा होता की या पंचायत समितीच्या कार्यालयात मुलभूत सोईसुविधा उपलब्ध नसताना देखील या कर्मचाऱ्यांनी कोणतेही आडेवेडे न घेता प्रामाणिकपणे काम केले. अगदी पावसाळ्यात तर जीव मुठीत धरून काम केले. अनेक वेळा इमारतीचे स्लॅब कोसळून अपघात होता होता वाचले. पण तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या नांगरीकांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या कामात आपल्याला येणाऱ्या अडचणी, गैरसोई कधी येवू दिल्या नाहीत.
याचाच परिणाम म्हणून कल्याण पंचायत समिती, कायमच जिल्ह्य़ात आघाडीवर राहिली, मग ते पंतप्रधान आवास योजना असो, हागणदारीमुक्त गाव असो, किंवा स्मार्ट ग्राम असो. याचे सर्व श्रेय हे जसे गावचे सरपंच व उपसरपंच सदस्य, ग्रामसेवक,. विस्तार अधिकारी आणि कार्यालयातील कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे गटविकास अधिकाऱ्यांना यांना द्यावे लागेल.त्यामुळे या कामातून थोडा वेळ काढून मन प्रसन्न करणारे वातावरण निर्माण व्हावे यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कल्याण पंचायत समितीच्या कार्यालयात महिलांचा हळदीकुंकू व तिळगूळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सुषमा लोणे यांनी फोन करून कार्यक्रमाला येण्याची विनंती केली अन तात्काळ त्यांनी मान्य केली व उपस्थित राहिल्या. यावेळी त्यांच्या बरोबर कल्याण पंचायत समितीच्या मा. सभापती रंजना देशमुख, सदस्या अस्मिता जाधव याही उपस्थित होत्या. 
यावेळी झेडपी अध्यक्षा सुषमा लोणे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करुन महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच यावेळी विविध प्रकारच्या योजना व विकास कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे, विस्तार अधिकारी विशाखा परटोळे, आणि सर्व महिला कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. 

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...