Thursday, 18 February 2021

सोन्याच्या दराने गाठला आठ महिन्यातील नीचांक ! "९४०० रुपयांनी स्वस्त झालंय सोनं"....

सोन्याच्या दराने गाठला आठ महिन्यातील नीचांक ! 

"९४०० रुपयांनी स्वस्त झालंय सोनं"....
 
जळगाव : सोन्याच्या किंमतींमध्ये  पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्याचे दर १११ रुपयांनी घसरले आहेत. एक तोळा सोनं ४६ हजार ७८८ या दराने विकलं जात आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. चांदीची किंमत १३५ रुपयांनी वाढली आहे.
  
सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा दर ६९ हजार ५०७ रुपये प्रति किलो इतका होता.
  
मागील पाच दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत असून आज आठ महिन्यांमधील नीचांक पातळीवर सोन्याचे दर पोहचले आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याचा दर प्रति तोळा ५६ हजार २०० पर्यंत पोहचला होता.
 
तेव्हापासून आजपर्यंत सोनं प्रति तोळा नऊ हजार ४०० रुपयांनी स्वस्त झालं आहे.
 
सोन्याला का लागली घरघर.....

देशामध्ये करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये लसीकरणाच्या माध्यमातून सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. याच गोष्टीचा फटका सोन्याच्या किंमतीला बसला असून सोन्याची जोरदार विक्री गुंतवणूकदारांकडून केली जात आहे. 

करोना लसीकरणामुळे शेअर बाजारामध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. 

त्यामुळेच सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी आपला मोर्चा आता शेअर बाजाराकडे वळवला आहे. 

सोन्याची विक्री करुन तो पैसा स्टॉक मार्केटमध्ये टाकण्याचा कल दिसून येत आहे. शेअर बाजारामध्ये अधिक जलद आणि जास्त रिटर्नस मिळत असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. शेअर बाजारात सध्या तेजी असल्याने अनेकांनी तिकडे गुंतवणूक केल्याचं या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
 
अर्थसंकल्पात झाली ती घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सोनं आणि चांदीवरील आयात करामध्ये मोठी कापत करण्याचा घोषणा केली होती.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...