Friday, 5 February 2021

रायते येथील बंद अंगणवाडी बनली तळीरामांचा अड्डा, ग्रामस्थांची तक्रार !!

रायते येथील बंद अंगणवाडी बनली तळीरामांचा अड्डा, ग्रामस्थांची तक्रार !!



कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील रायते ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणि रायते विभाग हायस्कूल रायते या शाळेजवळ असलेल्या  बंद व मोडकळीस आलेली अंगणवाडी ही तळीरामांचा अड्डा बनला असून येथे दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच गुन्हेगारी देखील वाढू शकते.हे थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


रायते ग्रामपंचायतीचे कार्यालयात समोर तसेच रायते विभाग हायस्कूल रायते या शाळेजवळ काही खोल्या होत्या. येथे सुरुवातीला जि प शाळेतील मुले बसत होते. पण त्यांची शाळा बांधकाम झाल्याने ते तिकडे गेले. यानंतर येथे अंगणवाडी भरू लागली. परंतु कोरोनाच्या लाॅकडाऊण काळात तीही न भरू लागल्याने आणि त्यांची दुस-या ठिकाणी सोय झाल्याने या खोल्या रिकाम्या पडल्या. याचा फायदा गावातील काही टवाळ खोरांनी उचलला. त्यामुळे या खोल्यांचे दरवाजे, खिडक्या गायब झाले. येथे तळीरामांचा अड्डा बनला, रात्रीच्या अंधारात दारु, पार्ट्या येथे होऊ लागल्याने येथे बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच येथेच लघुशंका केल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच उंदीर व घुशीने येथील जमीन भुसभुशीत केली असून याचा उकिंरडा केला आहे.
२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गावातील सुदाम भोईर, राम सुरोशे, वकील मनोज सुरोशे, संतोष सुरोशे, नितीन भोईर, गुरुनाथ सुरोशे, गणेश केमार, विजय कारले, उत्तम ठाकरे, बळीराम धनके, अमोल गोटीराम सुरोशे, रशीद शेख, योगेश घरत, योगेश लोणे, विजय सुरोशे आदी उपस्थित होते तेंव्हा त्यांच्या हे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब या परिसराची स्वच्छता करण्याची मागणी रायते ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

No comments:

Post a Comment

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !  कल्याण, राजेंद्र शिरोशे : कल्याण तालुक्यात वरप ग्राम...