Friday, 5 February 2021

केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना व राज्य सरकारच्या विरोधात विजदर वाढी विरोधात भाजपाने आयोजित केलेल्या आंदोलनाला मुरबाड मध्ये अत्यल्प प्रतिसाद !!

केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना व राज्य सरकारच्या विरोधात विजदर वाढी विरोधात भाजपाने आयोजित केलेल्या आंदोलनाला मुरबाड मध्ये अत्यल्प प्रतिसाद !!


मुरबाड ,(मंगल डोंगरे) : मुरबाड शहरात आज शिवसेने तर्फे आयोजित केंद्र सरकारच्या पेट्रोल -डिझेल दरवाढी विरोधात तर भाजपा तर्फे आयोजित केलेल्या महावितरणच्या विजदरवाढी विरोधात राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनास तालुक्यातील लोकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला .


    महाराष्ट्रात सर्वाधिक मतांच्या फरकाने निवडून आलेल्या आमदार किसन कथोरे यांच्या मतदार संघात भाजपला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. या बाबत पत्रकार व शासकीय अधिकाऱ्यां मध्ये जोरदार चर्चा होत होती. **भाजपाच्या ** टाळे ठोकण्याची भुक निवेदनावर भागवत आंदोलनाची सांगता.
     दोन्ही पक्षांच्या आंदोलनात पन्नास पेक्षा कमी कार्यकर्ते हजर होते. या सरकारच करायचं काय खाली डोके वरती पाय ही समान घोषणा दोन्ही ठिकाणी दिली जात होती .व दोन्ही पक्षांचे बडे नेते अनुपस्थित होते.
     शिवसेने तर्फे तीन हात नाका येथे इंधन दरवाढीचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शिवसेनेचे मुरबाड विधानसभा संघटक मधुकर घुडे, तालुका प्रमुख कांतीलाल कांटे, समन्वयक रामभाऊ दळवी, शेतकरी सहकारी संघाचे सभापती प्रकाश पवार , पंचायत समिती सदस्य अनिल देसले आदि नेते उपस्थित होते. त्यांनी नायब तहसिलदार प्रसाद पाटील यांना निवेदन दिले. 
       भाजप तर्फे महावितरण कार्यालया समोर केलेल्या आंदोलनात मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव , शहर अध्यक्ष सुधीर तेलवणे, सरचिटणीस महेंद्र पवार , मुरबाड शहर महिला अध्यक्षा छायाताई चौधरी , सरचिटणीस जयवंत कराळे, सुरेश बांगर, उपस्थित होते महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता सुरेश सुराडकर यांना निवेदन देवुन दुधाची तहान ताकावर भागवुन आंदोलन कर्ते रिकाम्या हाती परतले.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...