मुरबाडमधील वंचित वाड्या पाड्याना नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी द्या !!
**ठाणे जि.प.उपाध्यक्ष सुभाष पवार यांचे पाणी पुरवठा मंत्री व जिल्हाधिका-यांना साकडे **
मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरील पाणी टंचाई दुर करण्यासाठी जि. प. उपाध्याक्ष सुभाष पवार यांची पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागणी केली असुन
याबाबत तात्काळ उपाययोजना व्हावी असे साकडे घातले आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आदिवासी वाड्या आणि पाडे यांना पुरक पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळावी अशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्याक्ष सुभाष पवार यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुरबाड तालुक्यातील करचोंडे, झाडघर आणि येथील आजूबाजूच्या पाच गावपाड्यांपैकी एकूण 3500 लोकसंख्या असणाऱ्या करचोंडे आणि बांगरवाडी या दोन गावांकरिता असलेली नळ योजना जुनी व जीर्ण झालेली आहे. या गावांकरिता दरवर्षी उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत आटतात. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. या गाव पाड्यांकरिता यापूर्वी अनेक योजना केल्या परंतु त्या यशस्वी झाल्या नाहीत. त्यामुळे येथील जनतेला, आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
या गाव पाड्याना कायमस्वरूपी पाणी टंचाई निवारण करण्यासाठी मुरबाड टोकावडे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचा उद्भवामधून पूरक नळ पाणी पुरवठा योजना करण्यासाठी टंचाई आराखड्यात मंजूर करण्यात आली असून यासाठी मंजुरी मिळावी म्हणून मंत्रीमहोदय आणि जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment