Friday, 5 February 2021

जेष्ठ संपादक कांतीलाल कडू यांना पुरोगामी पत्रकार संघाचा 'महाराष्ट्र जीवन गौरव' पुरस्कार घोषित ! "रविवारी खोपोलीत श्रीमंत रोहित राजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार प्रदान"

जेष्ठ संपादक कांतीलाल कडू यांना पुरोगामी पत्रकार 
संघाचा 'महाराष्ट्र जीवन गौरव' पुरस्कार घोषित !


"रविवारी खोपोलीत श्रीमंत रोहित राजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार प्रदान"

       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : खोपोली समाजात जगल्याची भूमिका यशस्वीपणे वठवत समाज प्रबोधनातून दूरदृष्टी देणारे ज्येष्ठ संपादक, कवी, सामजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना पुरोगामी पत्रकार संघाने यावर्षीचा 'महाराष्ट्र जीवन गौरव' पुरस्कार घोषित केला आहे. रविवारी (7) दुपारी 11 वाजता खोपोलीत आयोजित केलेल्या सोहळ्यात पुरस्काराचे वितरण श्रीमंत रोहित राजे देशमुख यांच्या हस्ते होणार आहे, अशी घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

गेली तीन दशके पत्रकारितेसह सामाजिक हितासाठी भरीव योगदान देत सामाजिक कार्यकर्ते, कवी, ज्येष्ठ संपादक कांतीलाल कडू यांनी राज्यभर विविध क्षेत्रात अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून विद्येच्या दरबारातून आपल्या अभ्यासपूर्ण, व्यासंगी आणि धाडसी पत्रकारितेतून अनेक प्रकरणांना वाचा फोडली आहे. सहज, साध्या सोप्या शब्दांतून केलेल्या लिखाणातून त्यांनी राज्यभर वाचक वर्ग तयार केला आहे.

प्रारंभी 12 वर्षे साप्ताहिक आणि आता 13 वर्षे दैनिक निर्भीड लेखमधून पत्रकारितेची तत्व जपत पत्रकारिता क्षेत्रातही दमदार मुशाफिरी करत नावलौकिक प्राप्त केला आहे.

सामाजिक कार्याचा सिलसिला रोजच सुरू आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या पाणी प्रश्नावर पनवेल महापालिकेवर काढलेला धडक मोर्चा आणि त्यानंतर काही अंशी का होईना सुरळीत झालेला पाणी प्रश्न, महिलांची सुरक्षिता आणि काही कुटुंबांना लेडीज बारच्या विळख्यातून वाचविण्यासाठी केलेले आंदोलनही नागरिक विसरलेले नाहीत.

साहित्यक्षेत्रात त्यांचा वावरही लीलया राहिला आहे. त्यांची आतापर्यंत पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा असा एक वाचक वर्ग आहे. मुळत: पिंड कवीचा असल्याने पत्रकारितेतूनही समाजातील समस्यांची अचूक नाडी पकडून संवेदनशीलतेने त्यावर आघात करण्यात आणि समस्यांचा निपटारा करण्यात त्यांना यश येत आहे.

या सर्व बाबींचा सखोल आढावा घेवून पुरोगामी पत्रकार संघाने त्यांना यंदाचा महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्रदान घोषित केला आहे. सुरगाना घराण्याचे वारस असलेले उच्च शिक्षित युवा नेते श्रीमंत रोहित राजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे खोपोली येथे शानदार कार्यक्रमातून कडू यांचा गौरव करण्यात येईल, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...