मुरबाड येथील टेक्नो कंपनी मधील कामगारांना न्याय द्या- "कृष्णकांत तुपे"
मुरबाड, (मंगल डोंगरे) :
मुरबाड तालुक्यातील टेक्नो क्राफ्ट कंपनीमधील कामगार दिनांक २० डिसेंबर २०२० पासून भारतीय ट्रेड युनियन यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसले आहेत आज गेले च्याळीस दिवस उपोषण चालू आहे सदर उपोषणाला महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष यांचा मुरबाड दौऱ्यावर असताना कृष्णकांत तुपे यांच्या निवेदनाची दखल घेऊन उपोषणस्थळी भेट दिली व कामगारांचे म्हणणे ऐकून तात्काळ मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांना संपर्क करुन कारवाईचे आदेश दिले त्यानुसार अमोल कदम यांनी बैठक ठेवली परंतु बैठकी मध्ये कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री कृष्णकांत तुपे यांनी विधान भवनात जाऊन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची भेट घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व 54 कामगारांना कामावर रुजू करून घेण्यासाठी निवेदन व चर्चा केली त्याची दखल घेऊन विधानसभा अध्यक्ष नामदार श्री.नानाभाऊ पटोले साहेब यांनी विधानभवन येथे मंगळवार दिनांक 2/2/21रोजी तात्काळ बैठक बोलावली व तात्काळ कंपनी प्रशासनावर कार्यवाही करून संबधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामगारांना कामावर रुजू करून न्याय देण्याकरता आदेश दिले सदर चर्चा करताना श्री. कृष्णकांत तुपे मुरबाड तालुका अध्यक्ष काँग्रेस कामगार प्रतिनिधी कराळे ,मदन तरे, भरत दळवी. रुपेश भोइर, जिल्हाधिकारी ठाणे, कामगार आयुक्त, वन विभाग अधिकारी ठाणे हे विधान भवन येथे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment