Wednesday, 10 March 2021

कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येप्रश्नी केडीएमसी प्रशासनाने अखेर उद्यापासून (11 मार्च 2021) कठोर निर्बंध लागू केले आहेत !!

कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येप्रश्नी केडीएमसी प्रशासनाने अखेर उद्यापासून (11 मार्च 2021) कठोर निर्बंध लागू केले आहेत !!


कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोना रूग्णसंख्येचा आकडा आला आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणांची एकच धावपळ उडाली. आज कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 392 इतक्या मोठ्या रुग्णसंख्येने संपूर्ण प्रशासन थबकून गेलं. कारण गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर म्हणजेच 5 महिन्यांनंतर इथल्या कोवीड रुग्णसंख्येने 300 चा आकडा पार केल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल पोवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉक्टर, आयुर्वेदिक, होमिओपॅथी असोसिएशन, महापालिका प्रभाग अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली. यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी करायच्या उपायांवर चर्चा करत निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.

तर उद्या असणाऱ्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील सर्व शिव मंदिरं दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार. केवळ पूजा करण्यासाठी ही मंदिरं उघडली जाणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे कोवीड रुग्ण सर्रासपणे फिरत असल्याचे आढळून आले असून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवावे. असे पेशंट फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

'कल्याण डोंबिवलीमध्ये उद्यापासून हे असतील निर्बंध'…
--------------------------------------------------------------
अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंतच सुरू ठेवणे.

शनिवार आणि रविवारी पी1-पी2 नूसार दुकाने सुरू ठेवणे.

खाद्यपदार्थ आणि इतर हातगाड्या संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी.

हॉटेल्स-रेस्टॉरंट-बार रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवणे.

पोळीभाजी केंद्र 9 वाजेपर्यंत सुरू राहणार.

पार्सल सेवा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार.

भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवणार.

लग्न- हळदी समारंभात 50 पेक्षा अधिक लोकं नकोत, जास्त लोकं असल्यास गुन्हे दाखल होणार.

लग्न हळदी समारंभ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी, मास्क घातलेच पाहिजेत.

नियमांचे उल्लंघन झाल्यास वधू आणि वराच्या पित्यासह हॉल व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...