Saturday, 13 March 2021

कल्याण तालुक्यातील बेहरे येथे जिप अध्यक्षांच्या हस्ते घरकुल मार्ट चा उद्घाटन सोहळा संपन्न, आदिवासी लाभार्थ्यांचा गृहप्रवेश!

कल्याण तालुक्यातील बेहरे येथे जिप अध्यक्षांच्या हस्ते घरकुल मार्ट चा उद्घाटन सोहळा संपन्न, आदिवासी लाभार्थ्यांचा गृहप्रवेश!


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वाधिक गावाची मिळून तयार झालेल्या बेहरे ग्रामपंचायत हद्दीतील लाभार्थ्यांना घरकुल मिळावे म्हणून महाआवास अभियान कार्यक्रमांतर्गत 'घरकुल मार्ट' ही संकल्पना व तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी आवास योजना व उमेद कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच खडवली बेहरे येथे झाली व या घरकुल मार्ट चे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सुषमा लोणे यांच्या हस्ते आणि प्रकल्प संचालक जिग्रावियो श्रीमती छायादेवी शिसोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 


यावेळी कित्येक वर्षे बेघर असलेल्या आदिवासी लाभार्थ्यांनी उपस्थितीतांच्या साक्षीने गृहप्रवेश केला तेव्हा मात्र वातावरण भावनिक झाले होते.
कल्याण तालुक्यातील बेहरे ग्रामपंचायतीमध्ये ज्यू, वाकळस, खडवली, बेहरे वावेघर आदी गावांची मिळून एक ग्रामपंचायत तयार झाली असून महाआवास अभियान कार्यक्रमातंर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांमधील एक उपक्रम म्हणजे 'घरकुल मार्ट' ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे, विविध योजनांची आवास योजनेच्या कृतिसंगम कार्यक्रमांतर्गत घरकुल मार्ट ची अंमलबजावणी आवास योजना व उमेद कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने बेहरे येथे ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुषमा लोणे यांच्या हस्ते संपन्न झाले
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, महिला बचत गट अशा कामात पुढे येत आहेत. हे कौतुकास्पद असून घरकुल मार्ट च्या माध्यमातून हे गट बळकट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगून  महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण व्हावे यासाठी अशा संकल्पना अमलात आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी माझ्या ठाणे जिल्ह्यात होत असल्याचा मला आंनद वाटतो, असे गौरवोद्गार काढले
बचतगटांचा इतर व्यवसायात तर सहभाग आहेच. परंतु घरासाठी लागणारे साहित्य पुरविणे हा मोठा व्यवसाय करण्याचे धाडस घरकुल मार्ट च्या रुपाने करता आले. मंजूर लाभार्थ्यांनी घरकुलासाठी लागणारे साहित्य घरकुल मार्ट मधूनच खरेदी करावे जेणेकरून महिलांना ग्राहकाची खात्री निर्माण होतील व बाजारभावाप्रमाणे रास्त दराने साहित्याचा पुरवठा घरकुल लाभार्थ्यांना सहज होईल अशा दोन्ही बाजूंनी फायद्याच्या बाबी या संकल्पनेत आहेत.
यावेळी घरकुल मार्ट च्या उद्घाटन कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जू येथील आदींवाशी लाभार्थी रवी रामू सवार व राजू रामू सवार या शबरी आवास योजनेतील लाभार्थ्यांचा गृहप्रवेशाचा सोहळा झेडपी अध्यक्षा सुषमा लोणे व प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी वातावरण भावनिक झाले होते. 
दरम्यान यावेळी कल्याण पंचायत समितीचे उपसभापती रमेश बांगर, झेडपी सदस्या जयश्री सासे, गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कल्याण पंचायत समितीच्या सभापती अनिता वाकचौरे, सदस्य पांडुरंग म्हात्रे, रंजना देशमुख,  अस्मिता जाधव, दर्शना जाधव, संतोष पांडे सरपंच स्वाती जाधव, ग्रामसेवक तूषार पाटील, खुशाल छतलाजी, सुनील पाटील, अमित सय्यद, आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी विशाखा परटोले यांनी केले होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...