मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात १८ मार्च २०२१ रोजी रंगणार कोकणची लोककला कोकणचे खेळे - बहुरंगी नमन
'शाहिर विनोद फटकरे निर्मित श्री काळेश्वरी नाट्य नमन मंडळ, मुंबई (मढाळ - गुहागर) या लोकप्रिय बहुरंगी नमनाचा या मोसमातील प्रथम शुभारंभ प्रयोग'
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/मणस्वी मणवे) :
कोकण म्हणजे नररत्नांची खाण आणि पारंपरिक लोककलेची शान, कोकणातील अनेक लोककला काळानुसार लोप पावत चालल्या आहेत.त्यातील काही लोककला फक्त सणासुदीपुरत्याच मर्यादित न ठेवता त्या मध्ये पारंपरिक आणि आधुनिक समतोल साधून त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, व्यावसायिक झाल्या पाहिजेत, कोकणातील कलाकारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठीच कोकणातील बरेच लोककलाकार आप-आपल्या प्रमाणे प्रयत्न करीत आहेत. त्यापैकीचं एक कमी कालावधीत नावलौकिक मिळवलेलं गुहागर मधील श्री पाणबुडी देवी कलामंच (पाचेरी सडा) होय.
कोकणातील लोककला सर्वांना ज्ञात राहाव्यात यासाठीच श्री पाणबुडी देवी कलामंच मुंबईत विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते. नमन, जाखडी-नृत्य अर्थात शक्तीतुरा, भारूड, नाटक या सारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कोकणातील पारंपारिक संस्कृती नवीन पिढीला आपल्या कुटुंबसमवेत पाहवयास यावे, यासाठी प्रयत्नशील राहत आहेत.
नमन म्हटलं कि,त्यामध्ये पुरुषच पूर्वी स्त्री-पात्र साकारत असत. परंतु स्त्री-सुद्धा अभिनय करून रसिक प्रेक्षकांची मने जिकंतात हे या आधुनिक युगात तरुणींनी दाखवून दिले आहे.गतवर्षात स्त्री-पात्रासहित नमन प्रयोग आयोजन करत दामोदर नाट्यगृहात सलग ०३ नमन प्रयोग 'हाऊसफुल्ल' कार्यक्रम करून पुन्हा श्री पाणबुडी देवी कलामंच (पाचेरी सडा) यांचे उत्तम नियोजनबद्द कार्यक्रम पार पडतील. पुन्हा एकदा सध्याचं जगावर असणारं भयंकर संकट म्हणजे कोव्हिड - १९ या काळातही केवळ कलाकार व रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित घेऊन येतोय या मोसमातील पहिले आयोजन शाहीर विनोद फटकरे "निर्मित" श्री काळेश्वरी नाट्य नमन मंडळ, मुंबई (मढाळ-गुहागर) या नमन मंडळाचा एक दर्जेदार नावलौकिक असा कुटुंबसमवेत आवर्जून पाहण्यायोग्य कार्यक्रम गुरुवार दि.१८ मार्च २०२१ रोजी, रात्रौ ठीक ०८.३० वा. मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले - पूर्व (मुंबई) येथे आयोजित केला आहे.संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडीओ छायाचित्रण करण्यास सक्त मनाई असून रसिक प्रेक्षकांना कोव्हिड - १९ च्या दिवसांतील शासकीय नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तरी कोकणातील ही लोककला पहाण्यासाठी व कलाकारांना आशिर्वाद देण्यासाठी रमेश कोकमकर - ८८५०४२२७११, दिपक कारकर ९९३०५८५१५३, विश्वास डिंगणकर - ८६८९८५१८६४, महेश वीर - ९६९९२१५०५३, प्रशांत पाष्टे - ८२८६०२६५४२, निलेश चांदीवडे - ८१०४४२२३२९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment