दृष्टीहीन व वंचित कुटूंबाना किराणा सामान वाटप !!
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
जोगेश्वरी पूर्व येथील एक दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक कार्यकर्ते अजित वैद्य, प्रभा सोलंकी मॅडम, शीतल मेढेकर मॅडम, विलास जावकर व प्रियांस हिरवे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जवळपास पन्नास दृष्टीहीन व वंचित कुटुंबियांना किराणा सामान किट देऊन सहकार्य करण्यात आले. हे समान वाटप करण्यासाठी जोगेश्वरी पूर्व येथील प्रतापनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व जॉय सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतला.लॉक डाउन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कंपन्या बंद पडल्या, रोजगार बुडाले व कित्येकांवर उपासमारीची वेळ आली व आताही कोरोना प्रादुर्भाव वाढतो आहे व पुन्हा एकदा लॉकडाउन होते की काय अशा भीतीत अनेक हातावर पोट असणारी कुटुंब जीवन जगत असून अशाच काही कुटुंबाना दिलासा देता यावा म्हणून या दानशूर लोकांनी एकत्र येऊन हे किराणा समान (गहू, तांदूळ, डाळ, साखर, पोहे, रवा, कोलगेट, साबण व तेल) वाटले. लॉकडाउन पासून सुरू झालेले हे समान वाटप आजही सुरू असून हा किराणा समान वाटप यज्ञ यापुढेही सुरूच राहणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी सांगितले. हे समान वाटप करण्यासाठी प्रतापनगर मंडळाचे मुकेश पटेल, सुनील शिंदे, चैतन्य मोलतकर व पश्चिम रेल्वेचे गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त मोटरमन (माजी सैनिक) चंद्रशेखर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अस्मिता संस्था जोगेश्वरी यांनी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष शेखर पारखी व रमेश म्हात्रे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

No comments:
Post a Comment