म्हसळा शहरातील एसटी बस सेवा पूर्ववत करण्याला स्वराज्य प्रतिष्ठान रायगडला यश !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर / निलेश कोकमकर) :
स्वराज्य प्रतिष्ठान (रायगड) सामाजिक संघटनेच्या माध्यमातून रा. प श्रीवर्धन आगारास दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने श्रीवर्धनकडे जाणाऱ्या रा. प. गाड्या म्हसळा बाजार पेठेतून न नेता बायपास मार्गे वळविण्यात याव्यात असे निवेदन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते त्याला रा. प श्रीवर्धन आगारातुन सकारात्मक उत्तर देण्यात आलं.
म्हसळा येथून श्रीवर्धनकडे जाणाऱ्या एसटी बसेस प्रवासी, जेष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता तसेच त्यांना आर्थिक भुर्दंड जास्त लागू नये म्हणून यश म्हसळा शहरातून पूर्ववत हेत शहरातील एसटी बसा सेवा पुरवत करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवर्तन महामंडळ, नियंत्रक विभाग पेण, रायगड यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देवून त्या संदर्भात असलेली मागणी पूर्ण करण्यात आली आहे, ह्या पूढे म्हसळा तालुक्यातील नागरिकांना शहरामध्ये जाण्यासाठी हा पायी त्रास सहन करावा लागणार नाही, हा केवळ विजय नसुन समस्त सामान्य नागरिकांचा आवाज जिंकला अस म्हणायला काही हरकत नाही, असच ह्यापुढेही एकजुटीने प्रत्येक चळवळीत सहकार्याने लढत राहू, आमचं सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी लढणं हेच कर्तव्ये आणि कार्य राहील असे आवाहन स्वराज्य प्रतिष्ठान (रायगड) अध्यक्ष मा.श्री. भास्कर कारे आणि प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment