ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद भूषविणार !!
कल्याण (संजय कांबळे) : मराठी साहित्य मंडळ या सरकारमान्य प्रख्यात संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन यावर्षी शनिवार दिनाक 10 एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यामधील म्हसवड शहरामध्ये होणार असून या संमेलनाचे अध्यक्षपद कराड येथील ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव हे भूषविणार आहेत.
*विनायकराव जाधव* हे मूळचे *कराड* येथील असून त्यांच्या अरण्यवृदन या काव्यासंग्रहांमधून पोलीस आणि शेतकरी यांच्या वेदना त्यांनी आपल्या काव्यरचनेतून यथोचित शब्द रचनेतून मांडल्यामुळे ते साहित्यविश्वात प्रकाश झोतात आले आहेत, त्यांचे हिरकणी मासिकात , उपासना नियतकालीकात, संस्काराचा अमृतकुंभ, सह्याद्रीचा संस्कारयात्री तसेच पोलीस विशेषकांमध्ये त्यांचे लेख त्याकाळी विशेष करून गाजलेले आहेत पोलीस खात्यासारख्या रूक्ष क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या संवेदना जपल्या आहेत, त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या लेखांमधून तसेच कवितासंग्रहांमधून उमटले आहेत, सध्या ते हरवत चाललेले कृषिविश्व, महार समाजाची महानता, परडी रानफुलांची, धर्म संस्थापक,, प्रेषितांचे विज्ञान, तसेच गाडीवान ही चरित्रकथा अशा विविध विषय हाताळणारे *विनायकराव जाधव* हे नामवंत लेखकांमध्ये गणले जातात. त्यांना आतापर्यंत एकूण 254 बक्षिसे लाभलेली आहेत. या पूर्वी या राज्यस्तरिय संमेलनाचे अध्यक्ष पद अनेक नामवंतांनी
भूषविले होते थोर विचारवंत डॉ भालचंद्र मुणगेकर ज्येष्ठ कादंबरीकार दशरथ यादव यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, आणि आता विनायकराव जाधव यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे साहित्य वर्तुळात विशेष आनंद व्यक्त करण्यात येत आहे या संमेलनाचे उदघाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर हे करणार असून स्वागताध्यक्ष पद मुंबई येथील गौतम सरतापे आणि म्हसवड येथील धनश्री राजेमाने हे भूषविणार आहेत विशेष अतिथी म्हणून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व मराठी भाषा मंत्री विश्वजित कदम हे उपस्थित राहणार आहेत, स्थानिक आमदार जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर व माजी न्यायमूर्ती रावसाहेब झोडगे हे आपले विचार मांडणार आहेत. ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे (ठाणे) व कवयित्री सोनम ठाकूर (वसई) या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत हे विशेष होय.
दुसऱ्या सत्रामध्ये होणाऱ्या कवी संमेलनाचे अध्यक्षपद *कोल्हापूरच्या माजी प्राचार्या ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित उर्फ आशारेखा* या भूषविणार असून पुणे येथील कवयित्रीं नीता बोडके, चंद्रपूर येथील वसंतराव ताकधट, कराड येथील सुरेश लोहार, गोंदिया येथील शालू कृपाले, बारामती येथील हर्षदा झगडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तदनंतर होणाऱ्या परिसंवादाचे अध्यक्षस्थान खेड येथील मनोहर कांबळे हे भूषविणार असूनपुणे येथील डॉ सुनीता धर्मरावतुळजापूर येथील भैरवनाथ कानडे, कोल्हापूर येथील कृष्णा बागडे, धुळे येथील सुनंदा निकम, पुणे येथील शुभदा कोकीळ हे प्रमुख पाहुणे म्हणून परिसंवादात भाग घेणार आहेत परिसंवादाचा विषय आहे "बोकाळलेला मनुवाद".
महात्मा फुले चौकातून सकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या ग्रंथदिंडी चे उद्घघाटन म्हसवडचे नगराध्यक्ष तुषार वीरकरआणि उपनगराध्यक्ष धनाजी माने हे करणार आहेत. तरी साहित्य प्रेमी मंडळीनी या संमेलनाचा लाभ घ्यावा असे संमेलनाचे मुख्य आयोजक मराठी साहित्य मंडळाचे म्हसवड शहराचे अध्यक्ष महादेव सरतापे यांनी काढलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

No comments:
Post a Comment