२१ मार्च रोजी मुंबई येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटॉन कोकण विभागीय अधिवेशन !!
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : प्राध्यापक , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रथम कोकण ( मुंबई ) विभागीय अधीवेशन रविवार दिनांक २१ मार्च २०२१ रोजी सकाळी ११:०० ते ४:०० वाजेपर्यंत स्थळ : मराठा मंदिर सभागृह, आचर्य अत्रे नाट्य मंदिर , कल्याण पश्चिम जवळ आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटक : मा.बाळासाहेब साळवे ( माजी सिनेट सभासद , मुंबई विद्यापीठ) तर या कार्यक्रमास विशेष उपस्थिती प्रा . प्रकाश गोंधळी सर मा. वर्भावान सर , मा. भास्कर तिरपुडे सर, मा.शिल्पकार सर , मा . श्यामसुंदर धोदेसर, डॉ.पी.बी.लोखंडे सर, डॉ.गणेश वरखडे (सामाजिक कार्यकर्ता) यांची उपस्थिती लाभणार आहे तसेच या कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्रा.डॉ. शत्रुघ्र कांबळे, मा.रमाकांत वाघमारे सचिव प्रोटन, कोकण विभागा मा.संतोष गाडे, मा.बी.आर.आडे यांचे सखोल मार्गदर्शन लाभणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्षता : मा.गोरखनाथ वेताल सर (राष्ट्रीय प्रभारी, प्रोटान नवी दिल्ली) यांचे कार्यक्रमास ठेवलेले तीन मुख्य विषयांवर सखोल मार्गदर्शन लाभणार आहे
विषयः १) DCPS / NPS धोरणाचे शिक्षक - प्राध्यापक बांधव बहुजन समाजाच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर होणारे परिणाम कारणे आणि उपाय - गंभीर मंथन ,
२) नवीन शैक्षणिक धोरण व कामगार कायद्यात झालेले बदल यांचा बहुजन समाजावर होणारे परिणाम - एक चर्चा
३) वरील षड्यंत्र विरोधात निर्णायक लढा उभा करण्यासंदर्भात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, प्रोटॉनची भूमिका.
आज रोजी प्रस्थापित शासकवर्गाने कामगार आणि शिक्षकांसमोर अतिशय गंभीर उग्र स्वरूपाच्या समस्या निर्माण केलेल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरण २०२०, नवीन पेन्शन योजना, शिक्षण हक्क कायदा २००९, स्वयं अर्थ सहाय्यित्तशाळा कायदा २०११ या माध्यमातून प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि कामगार कायद्यामध्ये केलेल्या जाणीवपूर्वक बदलांच्या माध्यमातून कामगार वर्गाचे वर्तमान धोक्यात आणून भविष्यही नष्ट केलेले आहे . न्यायपालिका, कार्यपालिका, संसद, विधिमंडळ आणि मिडिया सह सर्व संविधानिक संस्थावर शासक जातींचा कब्जा असल्यामुळे या गभीर समस्या वर कोणीही बोलताना, या समस्याचा प्रचार प्रसार करताना दिसून येत नाही. एवढेच नव्हेतर प्रस्थापित शासक वर्गाद्वारे प्रायोजित शिक्षक संघटनाही याविरोधात ठोस भूमिका घेताना शिक्षक कर्मचारी वर्गामध्ये या षड्यंत्राबाबत जागृती निर्माण करून या धोरणां विरोधात संघटित शक्तीसह निणार्यक लढा उभारताना दिसून येत नाही. जर समस्या मूलनिवासी बहुजन समाजातील कर्मचारीवर्गाच्या असतील तर या समस्येचे समाधानही बहुजन समाजालाच शोधावे लागेल. कारण जे समस्या निर्माण करतात ते कधीही त्या समस्यांचे समाधान करू शकत नाहीत. बहुजन महापरुषाच्या १०८ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षातून, बलिदानातून व अथक परिश्रमाचे फलित म्हणजे हे मिळालेले हक्क अधिकार आहेत. कामगार कायदे हे कर्मचारी वर्गाचे सुरक्षा कवच आहेत. डोळ्यादेखत नष्ट होताना पाहणे हे सुज्ञपणाचे लक्षण नाही आणि बहुजन महापुरुषांचे वारस म्हणून घेणाऱ्या आम्हास ते भूषणावहही नाही. त्यामुळे या सर्व षडयंत्राच्या विरोधात म्हणजेच शिक्षणाचे खाजगीकरण शिक्षण संपवण्याची व कामगार विरोधी अन्यायकारक धोरणांच्या विरोधात कायद्याच्या चौकटीत राहून संविधानिक मार्गाने संघटीत , सक्षम आणि निर्णायक लढा उभारण्यासाठी सर्व कर्मचारीवर्गाने तन मन धनाने या जागृती परिषदेस सहकार्य करुन सफल करावे असे आव्हान कोकण विभागीय कार्यकारणी तथा कोकण विभागीय प्रोटान उपाध्यक्ष आयु. रेखा विनोद इंगळे मॅडम, मा. आयाजी दमदाडेसर प्रोटान जिल्हा अध्यक्ष, मा. बी. आर. आडे जिल्हा प्रोटान प्रभारी, रायगड जिल्हा प्रोटान कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणी सदस्य मा. धनराज वाघमारे सर, मा. धनंजय पवार सर, मा पी.बी.लोखंडेसर, मा. आचार्यसर, मा. वरखडेसर, मा. शैलेश लोखंडे सर, आयु. मोरे मॅडम व डॉ.संजय दाबारडे राज्य प्रोटान सचीव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment