माणगांवमध्ये अनुसूचित जाती-जमाती भूमिहीन शेतमजूर लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न !...
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रविवार दिनांक १४ मार्च २०२१ रोजी खरे मंगल कार्यालय, माणगांव येथे माणगांव तालुका बुरुड समाज संघटना आयोजित अनुसूचित जाती-जमाती भूमिहीन शेतमजूर लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळेस भीमशक्तीचे सरचिटणीस मा.श्री.गोपाळ तंतरपाले (दादा), रायगड जिल्हाध्यक्ष - श्री.रुपेशजी जामकर, महाड तालुका अध्यक्ष श्री.पी.एस.सोंडकर, माणगांव तालुका अध्यक्ष श्री.मंदार साळुंखे आणि समाज भूषण मा.श्री.अनंत पवार साहेब (PSI,DYSP ऑफिस माणगांव) यांनी अनमोल असे मार्गदर्शन माणगांव तालुक्यातील जमलेल्या समाज बांधवांस केले.
शासनाकडून (SC) अनुसूचित जाती-जमाती वर्गाला विविध योजना राबविल्या जातात परंतु सदर योजना त्यांच्या पर्यंत पोहचल्या जात नाहीत यात १) ग्रामपंचायत मार्फत घरकुल योजना २) पंचायत समिती (समाज कल्याण) मार्फत विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटर / लॅपटॉप ३) महात्माफुले विकास महामंडळ,अलिबाग मार्फत १०% अनुदानावर ५० हजार ते ५ लाख रु. कर्ज ४) खादी ग्रामउदयॊग, अलिबाग मार्फत ३५ % अनुदानावर ५ ते २५ लाख पर्यंत व्यवसायासाठी कर्ज ५) मागासवर्गीय विद्यार्थाना उच्च शिक्षणासाठी कमी व सवलतीत व्याजदराने कर्ज ६) नगरपंचायत मार्फत १०% समाजाच्या विकास कामासाठी अनुदान आणि ७) पंचायत समिती (समाज कल्याण) मार्फत आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन म्हणून रु. २.५ लाख अनुदान. या सर्व योजनेची माहिती डॉ.अजय मोरे यांनी उपस्थित समाज बांधवांस दिली.
महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक - जमीन -२०१५/प्र.क.६४/अजाक, दिनाक १४ ऑगस्ट २०१८ जी.आर. नुसार पदमश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमानी महारष्ट्र शासन ( सामाजिक न्याय) योजनेतून अनुसूचित जाती जमाती (SC) भूमिहीन शेतमजूर यांना ४ एकर बागायती व २ एकर जिरायती जमीन १०० % अनुदानावर मिळते. हि योजना माणगांव तालुक्यातील तळागाळातील गरजू समाज बांधव यांना मिळावी या हेतूने माणगांव तालुका बुरुड समाज संघटनेने अथक प्रयत्न करून कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमास मदत करणाऱ्या व कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे कौतुक व अभिनंदन !..

No comments:
Post a Comment