Monday, 8 March 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वॉर्ड क्र.१२४ च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला कोरोना योद्धयांचा सन्मान !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वॉर्ड क्र.१२४ च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला कोरोना योद्धयांचा सन्मान !


घाटकोपर, (केतन भोज) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वॉर्ड क्र.१२४ च्या वतीने आज दि. जागतिक महिलादिना निम्मित्त वॉर्ड मधील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांनी कोरोना काळात विक्रोळी पार्कसाईट विभागात आरोग्य सेवेसाठी विशेष कार्य केले त्या महिलांचा सत्कार करण्यात आला. 


सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी घाटकोपर तालुका अध्यक्ष सुरेश भालेराव, यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष वसंत सांगोलकर,वार्ड अध्यक्ष शंकर महाडिक, वार्ड उपाध्यक्ष किशोर महाले, १२४ महिला वार्ड अध्यक्ष चंदाताई साळेकर उपस्थित होते. सदर कार्यक्रम वार्ड अध्यक्ष मंगेश शेवाळे, महिला तालुका उपाध्यक्ष भावना वाघमारे, महिला वार्ड अध्यक्ष संगीता नवगिरे व वॉर्ड क्र. १२४ च्या महिला सर्व कमिटी सदस्य यांनी आयोजित केला होता.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...