Tuesday, 2 March 2021

लसीकरण सुरू नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचा कमला नेहरू रूग्णालयात गोंधळ.....

लसीकरण सुरू नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचा कमला नेहरू रूग्णालयात गोंधळ.....
 

पुणे : देशभरात ज्येष्ठ नागरिकांना करोना वरील लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुण्यातील ससून, कमला नेहरू, सुतार रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या ठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मात्र त्यापैकी कमला नेहरू येथे लसीकरण सुरू नसल्याने, ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्राच्या बाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 

यामुळे तिथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

केंद्र शासनाच्या आदेशानुसार करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात करण्यात येणार आहे. 
तसेच  ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जाणार आहे. 

लसीकरणाचा तिसरा टप्पा  पालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही लसीकरण करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण मोफत असून खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी कमाल २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ! ...