Monday, 15 March 2021

पत्रकार "मंगल डोंगरे" यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान !!

पत्रकार "मंगल डोंगरे" यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान !!


मुरबाड, प्रतिनिधी : मुरबाड तालुक्यात गेली वीस ते बावीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवुन, आपल्या लेखणी च्या माध्यमातून जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडणे व शासनाच्या विविध सोयी सवलती तसेच योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून करत असताना, सर्वसमान्यांना पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, नगरपंचायत कार्यालयात भेडसावणाऱ्या अनेक समस्यां सोडविण्यासाठी, मुरबाड औद्योगिक क्षेत्रात बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कुठल्याही प्रकारची पर्वा न करता न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारे व समाज सेवेसाठी स्वःताला समर्पित करून पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल दैनिक** बातमीदार** चे मुरबाड तालुका प्रतिनिधीं मंगलजी डोंगरे यांना राज्य स्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 


सदर सन्मान पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्री. यशवंतराव पवार यांच्या हस्ते यशस्विनी सभागृह बदलापूर येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी लोकशाहीर तथा चित्रपट लेखक,दिग्दर्शक संभाजी भगत, पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंतराव पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुणजी ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस प्रदिपजी रोकडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे, विश्वनाथ नाडगौडा, राजेश मापारा, प्रदेश संघटक, खलील सुर्वे, रायगड जिल्हा अध्यक्ष, शाहरुख मुलानी मंत्रालयीन सचिव, नरेश जाधव रायगड जिल्हा उपाध्यक्ष इत्यादी मान्यवर हे उपस्थितीत होते. या कार्यक्रमात बोलताना श्री. पवार यांनी सांगितले कि,समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात राहून आपल्या कलेच्या, किंवा अधिकाराचा वापर करून जनसेवा करणा-यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा कुठेतरी गुणगौरव होणे गरजेचे असते. पुरस्कार माणसांना प्रेरणा देतात. आणि हि उर्जा घेवून माणूस आपलं कर्तव्य करत राहतो. अशी गुणी रत्ने शोधण्याचे काम पत्रकार सुरक्षा समिती करत आहे व त्यांना सन्मानित करत आहे. आजच्या या कार्यक्रमात कलाक्षेत्रात, प्रशासकीय सेवेत, आरोग्य सेवेत, समाजसेवेत तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्याना राज्य स्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात राज्य स्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देवुन मुरबाडचे पत्रकार मंगलजी डोंगरे यांना सन्मानित करण्यात आले आहे.मुरबाड तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी खूप मोलाचं कार्य केले आहे. त्यांनी विविध स्तरावर विविध वृत्तपत्रांमध्ये चांगले लेखन केले आहे. जनतेच्या समस्या सोडविल्या आहेत. जनसेवेसाठी सदा तत्पर असल्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले व त्यांचे पुढील कार्यासाठी मनोबल वाढवून "अभिनंदन" करण्यात आले.

No comments:

Post a Comment

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा !

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा ! पुणे, प्रतिनिधी : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आ...