काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी चेतनसिंह पवार यांची निवड !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व माजी विधानसभाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी मंगळवारी मुरबाड तालुका काँग्रेस पक्षाच्या ब्लॅाक तालुका अध्यक्षपदी चेतनसिंह पवार यांची निवड नियुक्तीपत्र देवुन करण्यात आली.
मागील काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन संघटन वाढीचे काम सात्तत्याने करत आहेत. तसेच कोरोना काळा मध्ये केलेले भरिव काम, मागील ११ वर्षापासुनचा पाडाळे धरणबाधित शेतकऱ्यांना यशस्वी लढा देवुन, न्याय मिळवुन देणे अशा अनेक विषयांमुळे चेतनसिंह पवार यांना जबाबदारी देत असल्याचे यावेळी आ.नानाभाऊ पटोले यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व जेष्ठ नेत्यांच्या भेटी घेवुन आशिर्वाद घेवुन पुढील कामाला सुरूवात करणार तसेच येत्या काळामध्ये जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे माजी खासदार यांच्या नेतृत्वामध्ये भिवंडी लोकसभेवर व जिल्हा परिषद- पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणार असल्याचे काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी मत व्यक्त केले. तालुक्यांमधील शेतकरी, कामगार, तरुण-तरुणीं, महिला व पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. असे सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे प्रतिपादन केले.


No comments:
Post a Comment