रायगड प्रेस क्लबच्या वर्धापनदिनी "पालकमंत्री अदिती ताई तटकरे" यांच्या हस्ते 'पत्रकार विश्वास गायकवाड' आदर्श पत्रकारिता श्रमिक पुरस्काराने सन्मानित !!
बोरघर / माणगांव - पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रायगड प्रेस क्लबचा १५ वा वर्धापनदिन आणि पत्रकार सन्मान सोहळा रविवार दिनांक १४ मार्च २०२१ रोजी अलिबाग, कार्लेखिंड येथील "आम्रवन" येथे आयोजित करण्यात आला होता. सदर शानदार सोहळ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पालकमंत्री माननीय अदिती ताई तटकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगड प्रेस क्लबचे संस्थापक व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री एस.एम. देशमुख, प्रमुख अतिथी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, टाइम्स ऑफ इंडिया या वृतसमुहाचे सहसंपादक प्रफुल्ल मारकवार, कामगार नेते दिपक रानवडे, बिरजू मुंदडा इत्यादी दिग्गज मान्यवरांच्या आणि रायगड प्रेस क्लबची जिल्हा कार्यकारीणी पदाधिकारी, जिल्ह्यातील उपस्थित पत्रकार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील बोरघर गावचे पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड यांना आदर्श पत्रकारिता श्रमिक पत्रकार पुरस्कार, सन्मानपत्र, शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विजय मोकल, माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, माजी अध्यक्ष अभय आपटे, जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, जिल्हा संघटक मानसी चेऊलकर, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष संतोष पेरणे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, शशिकांत मोरे, मनोज खांबे, राजेंद्र जाधव, प्रवीण जाधव दरवेश पालकर, मोहन जाधव, प्रशांत गोपाळे, विजय गिरी, संजय भुवड, नागेश कदम, बी.एस. कुलकर्णी,भाई ओव्हाळ, ॲड. जनार्दन पाटील, देवा पेरवी, रवी शिंदे ,पद्माकर उभारे, गौतम जाधव, उत्तम तांबे,संतोष सुतार, दत्ता शिंदे, कमलेश ठाकूर, सुनील पाटील, अनिल मोरे, मल्हार संतोष पवार, हर्षद कशाळकर, राजन वेलकर, प्रफुल्ल पवार, राजेश भोस्तेकर, रमेश कांबळे, समीर मालोदे, वैभव भोळे, सुवर्णा दिवेकर, भारत गोरेगावकर, गिरीश गोरेगांवकर, संध्या पिंगळे, तालुका स्तरावरून आलेले पत्रकार, आजी-माजी पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगड प्रेस क्लबच्या नव्या कार्यकारिणीची नावे भारत रांजणकर यांच्या अध्यक्षतेखाली घोषित करण्यात आली. या कार्यकारिणी सदस्यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी "शहीद कॅप्टन विनायक गोरे" यांच्या सत्यघटनेवर आधारित प्रोत्साहनपर एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून देशसेवा ही कोठेही आणि कोणत्याही क्षेत्रात राहून करता येते, पत्रकारितेच्या माध्यमातूनदेखील उत्तम देशसेवा करता येवू शकते, असा संदेश देऊन उपस्थित सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष भारत रांजनकर यांनी तर सरचिटणीस शशिकांत मोरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. निसर्गरम्य अशा वातावरणात संपन्न झालेल्या या देखण्या कार्यक्रमाचे दिलखुलास असे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक संजय भुस्कुटे यांनी केले.

No comments:
Post a Comment