गोवेली कोविड लसीकरण केंद्रात पत्रकार संजय कांबळे यांनी घेतली कोविड व्हाॅक्शीन ची लस !
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेल्या गोवेली कोविड लसीकरण केंद्रात जाऊन पत्रकार संजय कांबळे यांनी घेतली कोविड व्हाॅक्शीन ची लस यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश कापूसकर, डॉ अभय राजूरकर डॉ आरती राजूरकर आदींची उपस्थिती होती.
कल्याण तालुक्यातील गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी १९९२ च्या आसपास ग्रामीण रुग्णालय सुरू झाले. कल्याण मुरबाड हा महामार्ग आणि परिसरातील ४०/५० गावासाठी हे रुग्णालय जणू वरदानच ठरले आहे. रुग्णालयास अत्यावश्यक वाटणाऱ्या पाणी, लाईट, आणि पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने अशा गैरसोईतही येथे समाधानकारक काम केले जात आहे. म्हणूनच दररोजच्या १०० ते १५० ओपीडी पेंशटंची तपासणी व औषध उपचार करुन आता येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचे नुकतेच उद्घाटन कल्याण पंचायत समितीच्या सभापती अनिता वाकचौरे यांच्या हस्ते झाले यानंतर कोविड व्हाॅक्शीन लसीकरणास प्रारंभ झाला.
आतापर्यंत १०० ते १७० च्या आसपास नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. यामध्ये जेष्ठ पत्रकार रविंद्र घोंडविदे, संजय कांबळे यांचाही समावेश आहे. लस घेतल्यावर अर्धा तास पुरुष वार्ड कक्षात. विश्रांती घेण्यास सांगितले जाते. व काही त्रास न जाणवला तर घरी सोडले जाते यावेळी डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचारी सतत लक्ष ठेवून असतानाचे चित्र दिसत होते.
हे सर्व कोविड लसीकरण केंद्र गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश कापूसकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ अभय राजूरकर, डॉ आरती राजूरकर, डॉ राजश्री सारणीकर, डॉ सोनाली शेंडगे, डॉ समरीन शेख, रेश्मा यादव कु रेखा बेळे, निशा बोरुडे, कु प्रांजली देसले, मनोज पावरा, प्रिया सुर्वे, निलिमा म्हात्रे, विमल चव्हाण, योगीता सुरोशे, आशा वर्कर हिरा गायकर, गिता धुमाळ सुनीता शेलार, आणि संजना गायकवाड या सर्वांचे लसीकरणामध्ये उत्कृष्ट योगदान लाभले असून यामुळे येणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



No comments:
Post a Comment