Tuesday, 2 March 2021

जिल्हा स्पर्धेत कल्याण चे खेळाडू चमकले !! 'मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी इंडियाची चमकदार कामगिरी'

जिल्हा स्पर्धेत कल्याण चे खेळाडू चमकले !!

'मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी इंडियाची चमकदार कामगिरी' 


कल्याण :- स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन ठाणे यांच्या वतीने मेरिडियन स्कूल कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्टुडन्ट ऑलंपीक गेम्स या स्पर्धेत. कल्याणच्या 'मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी इंडिया'
या क्लबच्या खेळाडूंनी कराटे मध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्ण व रौप्य पदके पटकावली.

या सर्व खेळाडूची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे....

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू खालील प्रमाणे
द्वीती थळे - सुवर्ण पदक
अंजली गुप्ता - सुवर्णा पदक 
दिया जैस्वाल - सुवर्ण पदक
सिद्धी काकड - रजत पदक 
ही स्पर्धा कल्याण येतील मेरिडियन स्कूल येथे पार पडली. या सर्व विजेत्या स्पर्धकांना सेन्साई महेश चिखलकर यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...