Tuesday, 9 March 2021

कल्याण येथील वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशन ने किल्ले माहुली येथील शिवरात्री निमित पुरातन शिवमंदिराचे रंगकाम केले !

कल्याण येथील वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशन ने किल्ले माहुली येथील शिवरात्री निमित  पुरातन शिवमंदिराचे रंगकाम केले !


कल्याण, प्रतिनिधी : शहापूर तालुक्यातील किल्ले माहुली च्या पायथ्याजवळ एक शिवकालीन शिवमंदिर असून त्याला माहुलेश्वेर असे म्हणतात. मंदिराच्या प्रवेशद्वारा लगतच नंदी असून नंदिसमोर शिवलिंग असून इतर शंकराच्या मंदिरा प्रमाणेच हे शिवलिंग सुद्धा जमिनीच्या समान पातळीवर नसून काहीसे खाली आहे. गाभाऱ्यातील शिवलिंगाच्या मागे एका कोनाड्यात माता पार्वतीचे शिल्प आहे. सुरवातीच्या काळात ट्रेकिंग साठी येणारे गिर्यारोहक आदल्या रात्री याच मंदिरात दर्शन घेऊन वास्तव्य करतात व सकाळी पुढील चढाई करत त्यामुळे या मंदिराला महत्व प्राप्त झाले आहे. 
वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशन च्या टिम ने महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिर आणी गणेश मंदिरात श्रमदान करून मंदिराचे रंगकाम केले तसेच परिसरातील साफसफाई केली या श्रमदानात योगेश कांबळे, सुहास पवार, प्रेम आहेर, पार्थ पाठारे , विशाल कंथारिया, सतिश बोबडे, साहस सतिश बोबडे, शौर्य सतिश बोबडे, अविनाश पोकळ, संदीप पंडीत, पुष्कर कानडे, युगा पुष्कर कानडे, केदार पटवर्धन, अनिल शेजवळ एकूण 14 स्वयंसेवक सहभागी होते तसेच वाशींद येथील सुजल वडके यांनी रंगकाम चे साहित्य दिले तसेच स्थानिक ग्रामस्थ कृष्णा आगिवले व रघुनाथ आगिवले यांचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

मोठीजुई शाळेत संगीतमय कवायतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !!

मोठीजुई शाळेत संगीतमय कवायतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मो...