Tuesday, 9 March 2021

शिवसेना शाखा क्रमांक १७, शिवबा मित्र मंडळ व श्री जनहित प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमाने संपन्न !!

शिवसेना शाखा क्रमांक १७, शिवबा मित्र मंडळ व श्री जनहित प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमाने संपन्न !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

       शिवसेना शाखा क्रमांक १७, शिवबा मित्र मंडळ व श्री जनहित प्रतिष्ठान आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विविध कार्यक्रमात ६५ ज्येष्ठ महिलांचा सत्कार, विभागातील महिला डॉक्टर, समाजसेविका, आरोग्य सेविका, महिला पोलीस यांना सन्मानपत्र देऊन कोविड योद्धा म्हणून गौरवपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. जनहित प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्रीमती लता रमेश मकवाना यांना त्यांची मिसेस इंडिया- २०२१ सबटायटल म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष  सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम समर्थ हॉल गावदेवी मैदानात समोर शिंपोली गाव बोरीवली(प.) येथे संपन्न झाला. मनपा नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, महिला विभाग प्रमुख सुजाता शिंगाडे, विधान सभा संघटक हेमा पुजारी, महिला उपविभाग प्रमुख वंदना खाडे, स्री रोग तंज्ञ जयश्री गढरी, पत्रकार आराधना कोकाठे, शाखाप्रमुख सुनिल पाटील, पत्रकार/ माझी वसुंधरा मित्र व महाराष्ट्र हरित सेना वन विभाग महाराष्ट्र शासन सदस्य समीर खाडिलकर, पत्रकार शांत्ताराम गुडेकर(मा.विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन), समाजसेवक ब्रिजल टेलर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह शिवसेना शाखा क्रमांक १७, युवा सेना, शिवबा मित्र मंडळ व जनहित प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती.महिला दिनानिमित आयोजित केलेल्या कार्यक्रमाला स्थानिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तापमान तपासणी व आँक्सिजन तपासणीसह सर्व कोविड -१९ बाबतचे नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेले आठ ते दहा दिवस साखरे सर, सुरेश लाड, पुनम सिलवानी, आशिष नाविक, अश्विनी सरफरे, वंदना नार्वेकर, योगिनी लाड मॅडम, निप्पू राय, नंदिनी अधावडे, पत्रकार समीर खाडिलकर, संदीप परब, बाबू पडवळ, गणेश पवार, प्रवीण राऊत, मिलन सावंत, प्रमोद पडवळ, जयप्रकाश मेहता, मकवाना साहेब, सनी घाडी, अक्षय पाटील, रितिक पाटील, सागर सरफरे, ओमकार भोसले, अलंकार भोसले, मंगेश शिंदे, समाजसेवक करण सर्व महिला पुरुष कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.साखरेसर यांनी उतमरित्या सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अश्विनी मँडम यांनी तर आभारप्रदर्शन योगिता लाड यांनी केले. सुनील पाटील शाखाप्रमुख, अध्यक्ष यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...