युवा संकल्प प्रतिष्ठाण भातगाव धक्का (रजि.)तर्फे मुंबईत क्रिकेटचे सामने उत्साहात संपन्न !!
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर / दिपक कारकर) :
गुहागर तालुक्यातील विविध क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या युवा संकल्प प्रतिष्ठाण भातगाव धक्का (रजि.) तर्फे मुंबई मध्ये प्रथमच नियोजित करण्यात आलेला युवा संकल्प प्रतिष्ठान भातगाव धक्का (रजि.) आयोजित "संकल्प चषक - २०२१" शिवाजी पार्क मैदान, दादर (मुंबई) येथे एकदिवसीय आयोजनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंडळाचे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सोबत क्रिडा क्षेत्रातील या उपक्रमाला खेळाडूंनी उत्तम प्रतिसाद दिला. ही स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी युवा संकल्प प्रतिष्ठान भातगाव धक्काचे अध्यक्ष प्रल्हाद मोरे, उपाध्यक्ष विलास मोरे, सचिव प्रमोद पाष्टे, खजिनदार श्रीकांत पाष्टे, सदस्य नारायण पाष्टे, उदय मोरे, सचिन पवार, सुरेश पाष्टे, सतिश पवार, प्रविण मोरे, दिपक मोरे, मंगेश गादेकर, कृष्णा पाष्टे, प्रकाश मोरे, अमोल पाष्टे, सागर पाष्टे, सतिश पाष्टे, प्रदिप मोरे, संदिप पवार, उमेश मोरे, मोहन मोरे, अनंत मोरे, संदिप पाष्टे, केतन पाष्टे, अमित मोरे, सतिश मोरे, संतोष य. मोरे, निलेश मोरे, सुमित मोरे, राकेश डिंगणकर, प्रसाद डिंगणकर, परेश मोरे, अजय मोरे, सुशांत पवार, श्रीधर मोरे, संतोष र. मोरे, ओंकार मोरे, प्रज्वल मोरे, तेजस मोरे आदींनी मोलाचं सहकार्य केले. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत झुंजार म्हाद्येवाडी संघाने सांघिक खेळाचं उत्तम प्रदर्शन करत विजेतेपदावर नाव कोरले तर बोंडये संघ उपविजेता ठरला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवा संकल्प प्रतिष्ठान क्रिकेट कमिटी आणि क्रिकेट संघाने अथक परिश्रम घेतले.सर्वच कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांतुन पार पडलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment