पेंडखळे चिपटेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई च्या प्रयत्नाने पेंडखळे राजापूर चिपटेवाडी तील गेल्या २५ वर्षा पूर्वीचा कच्चा रस्ता झाला डांबरीकरण !!
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/ दिपक मांडवकर) :
राजापूर तालुक्यातील कित्तेक महामार्ग आजही बिकट अवस्थेत पाहायला मिळत आहेत. आणि अशाच अवस्थेत राजापूर पेंडखळे येथील चिपटेवाडी मधील गेल्या पंचवीस ते तीस वर्षा पासून प्रमुख रस्ता बिकट अवस्थेत होता. ग्रामस्थांना त्या मुळे होणाऱ्या गैरसोईबद्दल मुंबई येथील चिपटेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई (रजि.) ही संस्था स्थापन झाल्यापासूनच चिपटेवाडी गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन विकासाची कामे करण्यास सुरुवात केली.
या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी सामाजिक कामे हातात घेतली आणि त्यासाठी पाठपुरावा करुण्यास सुरूवात केली त्यापैकीच एक महत्वाचे काम म्हणजे चिपटेवाडीमधील रस्त्याचे डांबरीकरण करून घेणे. हा रस्ता गेल्या २५-३० वर्षांपासून कोणत्याही प्रकारे लक्ष न दिल्याने पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत होता त्यावरून ग्रामस्थां होणाऱ्या अडचणी शिवाय रुग्णांना प्रवास करणे फार कठीण होऊन बसले होते. त्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून तसेच अभिजित तेली यांनी आपल्या शेष फंडातून निधी उपलब्ध करून दिला. आणि रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होण्याचे काम मार्गी लागले. या कामात मुंबई मंडळाला विशेष सहकार्य लाभले ते आमदार श्री. राजनजी साळवी आणि पंचायत समिती चे माजी सभापती श्री. अभिजित तेली, जिल्हापरिषद सदस्य श्रीमती. सोनम बावकर, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. प्रकाश कुवळेकर आणि ग्रामीण कमिटी व सहसचिव तसेच शिवसेना शाखाप्रमुख श्री. नितेश गराटे, ग्रुप ग्रामपंचायत पेंडखळे चे सरपंच श्री. राजेश हरीचंद्र गुरव तसेच पेंडखले गावचे पोलीस पाटील श्री. विजय गोविंद चिपटे या सर्वांच्या विशेष सहकार्यामुळे हे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत झाली.
चिपटेवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष. श्री. पुरुषोत्तम चिपटे, उपाध्यक्ष श्री. सुमंत चिपटे, सचिव श्री. संतोष तोस्कर, सहसचिव श्री. चंद्रकांत कांबळे, खजिनदार. श्री. संदिप जानस्कर, सहखजिनदार श्री. सूर्यकांत चिपटे, श्री. प्रकाश खानविलकर, श्री.काशिनाथ चिपटे, सदस्य श्री. दत्ताराम तोस्कर, श्री.गणपत चिपटे, श्री. वासुदेव चौगुले, श्री. सिताराम चिपटे, रमेश चिपटे, मोहन चिपटे, भगवान गराटे, संतोष नमसले, नंदकुमार चिपटे, तसेच ग्रामीण कमिटी चे उपाध्यक्ष श्री.संजय चिपटे, सदस्य श्री. भरत गराटे यांनी काम पूर्ण करून घेण्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेतली. आमदार श्री. राजन साळवी आणि सर्व सहकारी मंडळींचे आभार मानून असेच सहकार्य प्रत्येक वेळी मिळावे असे मनोगत कु. सचिन भानू चिपटे यांनी वेक्त केले.


No comments:
Post a Comment