उद्योग क्षेत्रात जगावेगळ्या मैत्रीतून पराकोटीच्या भातृभावाचा आदर्श माणगांवकरां देणारे श्रीनाथ एम्पोरीयम चे मालक राजपूत आणि कुमावत बंधू !!
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील माणगांव शहरात असलेल्या श्रीनाथ एम्पोरीयम या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या अग्रगण्य व दर्जेदार कापडाच्या विश्वसनीय दुकानाचे मालक श्री. किसनसिंग फुलसिंग राजपूत (वय 57) तसेच श्री. मांगीलाल कालूजी कुमावत (वय 56) हे दोघे मित्र असून ते मूळचे राजस्थान राज्यातील अाहेत. त्यांनी गेली चार दशके एकाच व्यवसायात यशस्वी भरारी घेत परस्परांचा विश्वास संपादन करून निष्ठापूर्वक व्यवसाय करून तमाम माणगांवकरां समोर मैत्री पूर्वक भातृभावाचा आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.
या दोघांनी माणगांव शहरात स्वतःचे दुकान टाकण्या आगोदर सुरवातीला तीन ते चार वर्ष ते एका कपड्याच्या दुकानात कामाला राहिले. तिथून कापड व्यवसायाचा अनुभव घेत प्रचंड मेहनत घेत नंतर त्यांनी सर्वार्थाने एकत्र येऊन श्रीनाथ एम्पोरीयम नावाचे स्वतःचे कपड्याचे दुकान टाकले. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्यांनी एक दुसऱ्या वर म्हणजे परस्परांवर विश्वास ठेवून विश्वासार्हता संपादन करून प्रचंड मेहनत घेत दोघे मित्र असून देखील सख्ख्या भावांच्या नात्याला लाजवेल असा जगावेगळा भातृभाव जोपासत एक दुसऱ्या विषयी मनात कधीही अविश्वास न ठेवता, न भांडता, कोणत्याही प्रकारचे हेवेदावे न करता प्रामाणिकपणे व्यवसाय सुरू ठेवला आहे. आणि आज रोजी माणगांव मधील श्रीनाथ एम्पोरीयम या सर्वप्रीय दुकानाला तब्बल 36 वर्ष पूर्ण होऊन सदर व्यवसायात शानदार आणि यशस्वी वाटचाल सुरू असताना त्यांनी व्यापारी उद्योग जगतात कायमचे स्थान निर्माण करण्यासाठी आणि व्यापारी उद्योग जगतातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यापार उद्योग क्षेत्रात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या ज्वेलरी व्यवसायाला स्पर्श करीत "श्रीनाथ ज्वेलर्स" या नावाचे दुकान त्याच जागेत, विभागणी करून आणि त्याच आत्मविश्वासाने सोबत राहून सुरु केला आहे. दरम्यान हे दोघेही मित्र गेली चार ते पाच दशके लोकांसमोर एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ म्हणून सर्व माणगांव करांना परिचित होते.
मात्र श्रीनाथ एम्पोरीयम नंतर श्रीनाथ ज्वेलर्स या नव्या दुकानाच्या उदघाटनाच्या निमित्ताने संपूर्ण माणगांवकरांना तसेच दक्षिण रायगडकरांना एक आश्चर्य चकित करण्यारी बाब समोर आली आहे. की सदर श्रीनाथ एमपोरीयम हे कापडाचे दुकान चालवीणारे या दोन्ही व्यक्ती सख्खे भाऊ नाही, मग काय ? गेल्या अनेक वर्ष हे दोघे एकत्र राहून यशश्वी रीतीने व्यवहार सांभाळून राहिल्या कारणाने सर्वांना वाटले हे दोघे सख्खे भाऊ आहेत यात कोणालाही जरासुद्धा शंका आली नाही. दुसरीकडे यांचा पारदर्शक व्यवहार पाहता लोकांसमोर हे दोघे 'आदर्श भाऊ' म्हणूनही समोर आले. मात्र ज्या वेळी श्रीनाथ एम्पोरीयम आणि श्रीनाथ ज्वेलर्स या नव्या दुकानांचे विभक्तीकरण झाल्यावर त्यांच्या विषयीची सदर बाब समोर आली असता सगळेच चक्रावून गेले की हे दोघे सख्खे भाऊ नाही मात्र जिगरी दोस्त म्हणून समजले. दरम्यान अशी जरी वस्तुस्थिती असली तरी कोणालाही या वर अद्यापही विश्वास बसत नाही. कारण हे दोघे जीवलग मित्र सख्ख्या भावांनाही लाजवेल असे गेली अनेक वर्ष माणगांव मध्ये श्रीनाथ एम्पोरीयम नावाच्या कपड्यांच्या दुकानात परस्परांवर विश्वास ठेवून एकनिष्ठ राहून त्यांनी आपल्या पार्टनरशीप व्यवसायात परस्परांचा आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करून कोणत्याही प्रकारचा अर्थिक अपहार, लबाडी अविश्वास, राग, द्वेष भांडणतंटा, हेवेदावे, मत्सर न करता सख्ख्या भावांनाही लाजवेल असे एकत्र राहिल्याने सर्व ग्राहकांना आणि माणगांव तालुक्यातील सर्व जनतेला वाटत होते की हे दोघे सख्य्ये भाऊ आहेत. मात्र सद्या लोकांना समजले की हे दोघे भाऊ नसून ते या व्यवसायात पार्टनर आणि जीवलग मित्र आहेत. हे सत्य समजल्यावर संपूर्ण तालुक्यात या दोघांच्या चांगुलपणा बद्दल, आदर्श मैत्री आणि आगळ्यावेगळ्या प्रेरणादायी भातृभावा बद्दल नाक्या नाक्यावर, गल्ली बोळात तसेच त्यांच्या असंख्य ग्राहक वर्गाच्या घरा घरात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगांव च्या व्यापारी विश्वात व वस्त्रोद्योग कापड व्यवसायात वैभवसंपन्न व वैभवशाली असलेल्या या " श्री. नाथ एम्पोरियम कपड्याच्या दुकानात 90 च्या दशकात तसेच 2000 साली दरम्यान अनेक देशातील, राज्यातील जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील अनेक क्षेत्रातील दिग्गज आणि राजकीय मंडळी या दुकानात अवर्जून काही काळ थांबून भेट दिल्याचे माहिती श्री. किसनसिंग यांनी सांगितले. या पैकी स्वर्गीय केंद्रीय आरोग्य मंत्री ना. ए.आर.अंतुले, माजी खा. रामशेठ ठाकूर, विद्यमान खा. सुनील तटकरे, शेकापाचे राज्य चिटणीस तथा विधानपरिषदचे आमदार श्री. जयंत भाई पाटील, माणगांवचे तत्कालीन लोकप्रिय स्वर्गीय आमदार अशोकशेठ दादा साबळे अशी मंडळी येत असे.
श्रीनाथ एम्पोरियम दुकानाचे हे दोन्ही मालक नगरातील नामांकित माणगांव व्यापारी संघटनेचे ' सक्रिय सदस्य आहेत. यांच्या कडून माणगाव तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमास अतिशय अनमोल अमूल्य अशी नेहमीच मदत होत असते. त्यांच्या संघटनेमार्फत नैसर्गिक आपत्ती, कोविड, निसर्ग चक्रीवादळ, समाज सेवा, तातडीचे मदत हवी असलेल्या काळात त्यांनी नेहमी हिरी हिरीने अग्रेसर राहून सामाजिक व मानवतावादी भूमिका ठेवून यथाशक्ती मदत केली आहे. माणगाव तालुक्यातील सर्व समाज घटकांच्या सुख दुःखात आवर्जून उपस्थित राहणारे, सर्वांना समजून घेणारे, सर्वांशी हसून खेळून राहणारे अत्यंत प्रामाणिक व इमानदार व्यापारी म्हणून त्यांची ओळख आहे.

No comments:
Post a Comment