Thursday, 8 April 2021

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे गावची कु.श्वेता गमरे प्रथम !!

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे गावची कु.श्वेता गमरे प्रथम !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/दिपक कारकर) :

                  गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा आयोजित जिल्हास्तरीय छत्रपती संभाजी महाराज निबंध स्पर्धा - २०२०-०२१, पत्रकार व गाव विकास समितीचे प्रमुख मार्गदर्शक सुहास खंडागळे यांच्या संकल्पनेतून तसेच गा.वि.समितीचे अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे यांसह गाव विकास समिती परिवाराच्या सहकार्याने ही नियोजित यशस्वीपणे पार पडलेली स्पर्धा होती.
जिल्हास्तरीय आयोजन असणाऱ्या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेतील अंतिम विजेती मु.पो.पिरंदवणे (ता. संगमेश्वर, जि रत्नागिरी) गावची सुकन्या कु.श्वेता संतोष गमरे हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन नुकतंच दि.०५ एप्रिल २०२१ रोजी सन्मानित करण्यात आले. अतिशय गरीब कुटुंबातील कौटुंबिक परिस्थितीचा संघर्ष करून श्वेता तृतीय वर्ष कला शाखा मधून आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. लहानपणीच शालेय उपक्रमात सहभाग घेणं, ही आवड असल्याने आजवर अनेक निबंध, वक्तृत्व स्पर्धेत श्वेताने भरभरून यश संपादन केले आहे. नुकत्याच श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित भव्य ऑनलाईन निबंध स्पर्धेत देखील श्वेताला दुसरा क्रमांक मिळाला होता. गाव विकास समिती आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या श्वेता गमरे हीच पंचक्रोशीतुन अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...