राज्यातील सर्व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे वारस नॉमिनेशन अद्ययावत करण्यात यावेत !
"महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई अध्यक्ष श्री. तानाजी कांबळे यांची मागणी"
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
राज्यातील सर्व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सेवेत नियुक्त झाल्यावर त्यांच्या शालेय अभिलेखांमध्ये वारस नोंद (नॉमिनेशन )केले जाते.
बहुतेक वेळेस कर्मचारी अविवाहित असल्याने त्या कर्मचाऱ्यांच्या घरातील इतर सदस्यांची नोंद केली जाते. काही कालावधीनंतर विवाह झाल्याने अथवा वारसाचा मृत्यू झाल्यावर अनेक कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये बदल केलेला नसतो. दुर्दैवाने अचानक कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास वैध वारस नोंद नसल्यास वारसाला संबंधित मयत कर्मचाऱ्यांचे सेवेचे लाभ (सेवानिवृत्ती वेतन, उपदान, भ. नि. नि. ठेव) मिळण्यास अडचण होते. सद्यस्थितीत कोरोनाच्या प्रदूर्भावाने दुर्दैवाने अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आकस्मिक निधन पावले. सदर कर्मचाऱ्यांचे योग्य वारस नोंद नसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसाला लाभ देणे अडचणीचे होणार असल्याचे प्रसिद्धी प्रमुख श्री युवराज कलशेट्टी यांनी सांगितले. भविष्यात ही स्थिती इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बाबतीत दुर्दैवाने उद्भवू नये म्हणून त्वरित उपाययोजना होणे आवश्यक आहे. याबाबत त्वरित वारस नोंद तपासणी करून अद्ययावत करण्याचे आदेश राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दयावे व सेवानिवृत्ती विषयक सर्व लाभ त्वरित वारसदारस देण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई अध्यक्ष श्री तानाजी कांबळे यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment