चिंताजनक ! राज्यात काल दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत व मृत्यूच्या संख्येत वाढ !
मुंबई : दिवसभरात राज्यात 9 हजार 43 रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची काल, मंगळवारी नोंद झाली. तसेच राज्यात 188 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 57 लाख 42 हजार 258 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.9 टक्के एवढे झाले आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 98 लाख 86 हजार 554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 87 हजार 529 (15.01टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात 6 लाख 58 हजार 863 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4 हजार 196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 23 हजार 340 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

No comments:
Post a Comment