छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळणार – तहसिलदार तळा
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : 193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील तळा तालुक्यातील मतदार यादया अदयावत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तळा तालुक्यात एकुण 55 यादी भाग आहेत. त्यापैकी 46 मतदारयादी भागात एकुण 771 मतदारांचे मतदार यादी मध्ये छायाचित्र नसल्याचे सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. मतदारांचे रंगीत छायाचित्र गोळा करण्याचे काम मतदान केद्रस्तरीय अधिकारी (BLO) करीत आहेत. स्थलांतरीत मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली असता स्थलांतरीत मतदार दिलेल्या मतदारयादीत आढळून आले नाहीत. त्यांचे पंचनामे तहसिलदार कार्यालय तळा येथे पाहणीसाठी उपलब्ध आहेत. मतदारांनी यादी तपासून रंगीत छायाचित्र तहसिलदार कार्यालय तळा येथील निवडणूक शाखा किंवा संबंधित सजेचे तलाठी कार्यालय किंवा संबंधित मतदान केद्राचे BLO यांचेकडे दिनांक 30 जून, 2021 पुर्वी जमा करावेत अन्यथा छायाचित्र नसलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल असे जाहिर आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी 193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ तथा तहसिलदार तळा यांचे वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment