दिलासादायक ! कोरोनाबाधित रुग्णसंख्येत तसेच मृत्यूच्या आकड्यात घट !
मुंबई : राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधित आहे. तसेच रग्णसंख्याही घटली आहे. त्यामुळे एकंदरीत राज्यातील कोरोना आकडेवारीचा ग्राफ खाली येत आहे. तर कोरोना मृतांची संख्याही १०० पेक्षाही कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार २७० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३ हजार ७५८ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहे. तसेच ९४ कोरोनाबाधितांनी प्राण गमावले आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार २७० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख ७९ हजार ०५१ वर पोहोचली आहे. राज्यात आज ९४ कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूमुळे राज्यात एकूण मृतांचा आकडा १ लाख १८ हजार ३१३ वर पोहचला आहे. राज्यात सध्या १ लाख २४ हजार ३९८ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तसेच गेल्या २४ तासांत १३ हजार ७५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ५७ लाख ३३ हजार २१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे.

No comments:
Post a Comment