राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णसंख्या बरे होणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा तिप्पट ! रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांखाली !
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आसपास तर राज्यात आज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या तिप्पट असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. राज्यात आज 9 हजार 336 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 378 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
आतापर्यंत 58 लाख 48 हजार 693 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95.91 टक्के आहे. राज्यात आज 123 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 23 हजार 225 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
No comments:
Post a Comment