भिवंडी पोलिसांनी ताब्यात घेतलेला मुलगा निघाली मुलगी,पोटाची खळगी भरण्यासाठी व सुरक्षेसाठी केले होते वेषांतर !
अरुण पाटील, भिवंडी, दिं.4 :
घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं पुण्यातील एका मुलीनं घरात कोणालाही न सांगता कामासाठी मुंबईत आली होती. पण या ठिकाणी आल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी व स्वतःच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तिनं चक्क मुलाचे वेषांतर करण्याचा निर्णय घेतला . तिने मुला प्रमाणे केस बारीक करून मुलांचे कपडे घालून तिनं मुंबईत तब्बल आठ महिने संघर्ष केला. कामा साठी दारोदारी भटकली, पण लॉकडाऊनमुळे तिला कुठेही काम मिळालं नाही. त्यामुळे तिनं भिंवडीत वेगवेगळ्या इमारतीच्या आडोशाला रात्र काढत संघर्ष करत होती. मिळेल ती छोटी-मोठी कामं करत ती आपला उदरनिर्वाह करत होती.
पण भिवंडीतील शांतीनगर परिसरात पोलीस गस्त घालत असताना संबंधित मुलीच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी तिला मुलगा समजून ताब्यात घेतलं आणि चौकशी साठी पोलीस स्थानकात आणलं. पण चौकशीसाठी आपण एका मुलाला ताब्यात घेतलं नाही, तर मुलीला ताब्यात घेतल्याचं कळाल्यानंतर पोलीसही हैराण झाले. यानंतर संबंधित मुलीनं आपल्या संघर्षाची कहाणी पोलिसांना सांगितली. तसेच आपल्य सुरक्षितते साठी आपण मुलाचा वेष घेतला असल्याचंही तिनं पोलिसांना सांगितलं.
यानंतर पोलिसांनी दोन दिवस संबंधित मुलीची माहिती काढत तिच्या घरचा पत्ता शोधला. तेव्हा संबंधित मुलीची ओळख खरी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित मुलीचं नाव छाया दशरथ माने (वय-21) असून ती पुण्यातील हडपसर परिसरातील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. मागील आठ महिन्यांपासून ही मुलगी भिवंडी परिसरात समीर शेख नावानं वावरत होती. दरम्यानच्या काळात ती मुलगी असल्याचं कोणाच्याही निदर्शनास आलं नाही.
दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घेतला. तसेच त्यांना भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात बोलावून मुलीला त्यांच्या स्वाधीन केलं आहे. आठ महिन्यापूर्वी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आई वडिलांनी पुण्यातील एका पोलीस ठाण्यात नोंदवली असल्याचंही निष्पन्न झालं आहे.

No comments:
Post a Comment