ठाणे उपवन येथील तलावात पोहण्याचा नादात तरुणाचा मृत्यू !
अरुण पाटील, भिवंडी, दिं.4 :
ठाणे शहरातील उपवन तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांपैकी एका तरुणाचा पोहनाच्या नादात बुडून मृत्यू झाला आहे. तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सोहेल बेग असून तो ठाण्यातील हाजुरी परिसरात राहतो.
सोहेल आणि अन्य एक तरुण असे दोघे जण शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता तलावात पोहण्यासाठी उतरले. परंतु सोहेल याला पोहायला येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, पोलिस आणि टीडीआरएफच्या पथकाने धाव घेतली आणि सोहेलचा तलावात शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक तास हे शोधकार्य सुरु होतं. त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांना सोहेल बेग याचा मृतदेह आढळला.
सदर तरुणाचा मृतदेह रात्री ०९:१४ वाजता स्कुबा डायव्हिंग टीमच्या मदतीने तलावाबाहेर काढून वर्तकनगर पोलिस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आणि रुग्णवाहिकेतून पुढील कार्यवाहीकरता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत कळताच सोहेलच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला.

No comments:
Post a Comment