Tuesday 27 July 2021

ऍक्सॉन हॉस्पिटल मध्ये मेंदूच्या धमणीच्या फुग्याची किचकट न्यूरो इंटरव्हेशनल शस्रक्रिया यशस्वी ! "मेंदू विकार तज्ञ् इंटरव्हेशनल न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश किनगे यांच्या ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल मध्ये मेंदूच्या धमणीच्या फुग्याची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात आली".

ऍक्सॉन हॉस्पिटल मध्ये मेंदूच्या धमणीच्या फुग्याची किचकट न्यूरो इंटरव्हेशनल शस्रक्रिया यशस्वी !

"मेंदू विकार तज्ञ्  इंटरव्हेशनल न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश किनगे यांच्या ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल मध्ये मेंदूच्या धमणीच्या फुग्याची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात आली". 


जळगाव : आसोदा येथील उज्वला मनोज चौधरी (वय ४८) यांना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उलटी होऊन, चक्कर येऊन पडल्याने मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला. 


त्यांना ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल मध्ये दाखल केल्या नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅन केल्यावर मेंदू मध्ये रक्तस्त्राव झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर निलेश किनगे यांनी मेंदूची ऍन्जोग्राफी केली. त्यात उज्वला मनोज चौधरी यांच्या मेंदूच्या एका धमणी मध्ये वाइड नेक ऍन्युरिज्म (फुगा) झाला असल्याचा निष्कर्ष निघाला. डॉक्टर निलेश किनगे आणि त्यांच्या चमूने सलग ३ तास शस्त्रक्रिया करून मेंदूच्या धमणी मधील फुग्यात जाळी बसवली ज्याला  स्टेण्ट असिस्टेड कोइलिंग असे म्हणतात. या आधी अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पुणे अथवा मुंबई जावे लागत होते. पण आता डॉक्टर निलेश किनगे मेंदूवरील अशा किचकट शस्त्रक्रिया जळगाव मध्येच यशस्वीपणे पार पाडत आहे.  

काय आहे वाइड नेक ऍन्युरिज्म?

या मध्ये रुग्ण्याच्या मेंदूतील वाहिनी मध्ये जन्मतःच  लहान किंवा मोठी मान असलेले फुग्यासदृश्य वाक  निर्माण होतात आणि अचानकपणे ते फुटल्यास त्यातून रक्तस्त्राव झाल्यास रुग्ण दगावू शकतो. अशा प्रकारच्या फुग्यांमध्ये मांडीतून तार टाकून तो मेंदूच्या धमणी पर्यंत पोहोचवून त्या फुग्यात जाळी बसवली जाते.  लहान मानेचा असल्यास कोइलिंग पद्धतीने शस्त्रक्रिया होते आणि फुगा मोठ्या मानेचा असल्यास  स्टेण्ट असिस्टेड कोइलिंग पद्धतीने शस्त्रक्रिया होते. या शस्त्रक्रियेमुळे मेंदूत रक्तस्त्राव होण्याची शक्यता उरत नाही. अशी हि आधुनिक जीवनदान देणारी शस्त्रक्रिया आहे.

1 comment:

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...