Wednesday 28 July 2021

मुरबाड तालुक्यातील प्रतिनियुक्त्या रद्द करून तात्काळ रिक्त पदे भरा !!

मुरबाड तालुक्यातील प्रतिनियुक्त्या रद्द करून तात्काळ रिक्त पदे भरा !!

**स्मरण पत्राद्वारे माजी सभापती श्रीकांत धुमाळ यांनी केली मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे मागणी **


मुरबाड, (मंगल डोंगरे) : गाव विकासाचा केंद्र बिंदू असणाऱ्या मुरबाड पंचायत समिती मध्ये  ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक शासकीय कर्मचारी आणि अधिका-यांची रिक्त पदे असुन ब-याचश्या अधिकारी वर्गाकडे प्रतिनियुक्त्यांवर मुरबाड पंचायत समितीचा गाडा ब-याच दिवसांपासुन चालवला जात आहे. 


या गंभीर बाबीची दक्षता घेत तत्कालीन सभापती श्रीकांत धुमाळ यांनी  मुख्यकार्यकारी अधिकारी ठाणे यांचे कडे लेखी पत्राद्वारे मागणी करून  मुरबाड तालुक्यातील हि रिक्त पदे तात्काळ भरा आणि प्रतिनियुक्त्या रद्द करा. असे सांगितले, होते.त्यावेळी त्यांना तसे हो म्हणून सांगण्यात आले होते. मात्र त्यांचा सभापती पदाचा कार्यकाळ संपुन दुसरी व्यक्ती त्या खुर्चीत विराजमान झाली. तरी जिल्हा दरबारी ह्या समस्येची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. मात्र उच्च विद्याविभूषित आणि ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच आणि स्वच्छ सुंदर ल आदर्श गावाचे निर्माते असणारे मुरबाड पंचायत समितीचे तत्कालीन सभापती श्रीकांत धुमाळ यांना हि गोष्ट स्वस्त बसु देत नाही.  म्हणून त्यांनी पुन्हा एकदा मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना स्मरणपत्र देवुन मुरबाड तालुक्यातील ग्रामसेवक आणि सहाय्यक कनिष्ठ व सहाय्यक वरिष्ठ अधिकारी यांची  रिक्त पदे  तात्काळ भरावित.आणि पर्यायी व्यवस्था म्हणून केलेल्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली आहे.
             सध्याच्या परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ग्रामसेवकांची सर्वात जास्त रिक्त पदे आहेत.एकेका ग्रामसेवकाकडे दोन-तीन ग्राम पंचायतींचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना धड कुठल्या एका ग्रामपंचायतीचा कार्यभार  सांभाळता येत नाही.याशिवाय नागरिकांची कामे हि वेळेवर होत नाही. प्रसंगी ग्रामीण भागातून नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. ते आर्थिक द्रुष्टीने परवडण्यासारखे नसते.शिवाय ग्रामसेवक वर्ग कुठल्याही एका ठिकाणी उपलब्ध होत नाही. आणि  प्रतिनियुक्त्यांवर नेमलेल्या अधिका-यांकडे दोन-तीन खात्यांचा अतिरिक्त भार. सोपवलेला असतो. त्यामुळे अधिकारी वर्गाला सुद्धा लोकांची कामे वेळेत पुर्ण करता येत नाही. म्हणून जनतेचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी व वेळेत कामे पुर्ण करण्यासाठी तालुक्यातील रिक्त पदे भरुन प्रतिनियुक्त्या ही  तात्काळ रद्द कराव्यात .प्रत्येक स्वतंत्र खात्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावे. असे स्मरणपत्र मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान गटनेते श्रीकांत धुमाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना दिले असुन ,ठाणे जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनाही त्याची प्रत रवाना करण्यात आली असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना श्री.धुमाळ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...