Wednesday 28 July 2021

कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला ! "हजारो नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास"

कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला !

"हजारो नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास"

कल्याण, २७ जुलै : वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. तब्बल २० तासांनी हा पूल खुला करण्यात आला. पुलाच्या खांबाला कोणतेही तडे गेले नसल्याचे तसेच हा उड्डाणपूल सुस्थितीत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आल्याने या पुलावरील वाहतूक सुरू केल्याची माहिती कल्याण शहर वाहतूक यांनी दिली.

हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गांधारी पुलाच्या खांबाला तडे गेल्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे सोमवारी रात्री १० वाजल्यापासून इथली वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कल्याण कार्यालयातील उपअभियंता प्रशांत मानकर यांनी सांगितल्याप्रमाणे आज दुपारी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पुलाला कोणतेही तडे गेलेले नसून पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या काळ्या कापडाने सर्व गोंधळ उडाल्याचे समोर आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हिरवा कंदील दिल्यानंतर आज संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा खुला करण्यात आल्याची माहिती ट्रॅफिक एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली. तसेच वाहतुक बंद करण्यासाठी घालण्यात आलेले बॅरिकेट्सही तातडीने बाजूला करण्यात आले.

हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाल्याने पुला पलीकडे राहणाऱ्या गावातील हजारो नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पूल सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.


No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...