राज्यात रुग्णसंख्येत मोठी घट ! बरी होणारी रुग्णसंख्या नवीन रुग्णांच्या दुप्पट ! रिकव्हरी रेट परत ९६ टक्क्यांवर !
सोमवारी कोरोनाबाधित मृतांची संख्या शंभरच्याही खाली आलेली दिसली. रविवारी १२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तर सोमवारी ५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
राज्यात आतापर्यंत १ लाख २३ हजार १३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे. तसेच सोमवारी राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जवळपास दुप्पट होते. आज १३ हजार ०२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,६१,७२० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के एवढे झाले आहे.

No comments:
Post a Comment