भाजपा सोबत जुळवून घ्या सांगणारे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक आज अधिवेशनाला हजर.!
अरुण पाटील, भिवंडी :
काही दिवसांपूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली होती. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केली होती. या लेटरबॉम्ब नंतर प्रताप सरनाईक हे आज अधिवेशनाला हजर होते.
गेले काही दिवस अज्ञातवासात असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आज विधान भवनात आले. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागं खुर्चीवर बसत सरनाईक यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. यावेळी प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आज अधिवेशन आहे पक्षाने व्हिप बजावला असल्यामुळे मी उपस्थित झालो असं प्रताप सरनाईकांनी सांगितलंय. पण मी काही विजय मल्या, निरव मोदी किंवा मेहूल चोक्सी नाही आहे. मी या देशात आहे आणि इथेच मरणार. अशी भावनिक प्रतिक्रीया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलीय.
कौटुंबिक कारणामुळे मी बाहेर होतो वा येता येत नव्हतं. पण मी काम करत होतो. महाविकास आघाडीतील नेत्यांनी तेव्हा मला हवा तसा सपोर्ट केला नाही. म्हणून मी तस पत्र पाठवलं. पण आता तो विषय संपला, असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं.तसेच मला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं आहे. तयामुळे मी कुठेही लपून राहिलेलो नसल्याचंही ते म्हणालेत. देशात कुठेही सरनाईवर गुन्हा दाखल नाही, लेखी स्वरूपात आरोप लेखी नाही, जबाब नाही. MMRDAबाबत माझ्या विरोधात जो आरोप लावलाय त्यावर तपास केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
माझ्यावर झालेली शस्त्रक्रिया आणि इतर घरी कुटुंबियांच्या पार्श्वभूमीचा विचार व्हायला हवा होता, असंही ते म्हणालेत. 84 हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो आहे. भाजप सेना युती तुटायची होती, तेव्हा अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री व्हावे अशी मी मागणी केली होती. नंतरही आम्ही सगळ्या आमदारांची खबरदारी घेत होतो, असं सरनाईक म्हणाले आहेत.
अनव्य नाईकवर मी आवाज उचलला. कंगना पोलिसांबद्दल बोलत होती. तिच्या विरोधात हक्कभंग आणला. महाराष्ट्राविषयी, पोलिसांविषयी आणि इतर विषयी मी सतत लढत होतो. त्यामुळे मी विरोधकांचा टार्गेट होतो. म्हणून माझ्यावर काहीच तक्रार नसता मला असं चौकशीत अडकवल जातं असल्याचं संप्तत प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment