Sunday, 4 July 2021

उदयनराजे सेना प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासींना धान्य, जिवनावश्यक वस्तू व छत्र्यांचे वाटप !!

उदयनराजे सेना प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासींना धान्य, जिवनावश्यक वस्तू व छत्र्यांचे वाटप !!


टिटवाळा, उमेश जाधव : उदयनराजे सेना प्रतिष्ठान आणि बाळकडू पत्रकार संघटना यांच्या वतीने रवीवारी मुरबाड तालुक्यातील डेहनोली व माल्हेड येथील आदिवासी वाडीतील १०१ आदिवासी बंधु-बघीनींना धान्य, जिवनावश्यक वस्तू व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. 


कोरोना काळात अनेक ठिकाणी गरीब, गरजू व आदिवासींना धान्याचे किट व जिवनावश्यक वस्तूंचे तसेच पत्रकारांना छत्री, मास्क व सॅनिटायझरचे वाटप   उदयनराजे सेना प्रतिष्ठान व बाळकडू पत्रकार संघ यांच्या वतीने करण्यात आले. 


या पार्श्वभूमीवर रविवारी मुरबाड तालुक्यातील डेहनोली व माल्हेड येथील १०१ आदिवासी बंधु-बघीनींना धान्याचे किट, जिवनावश्यक वस्तू व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी उदयनराजे सेना प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सागर तवले, आसनगावचे सरपंच जालिंदर तळपाडे, स कामगार सेना अध्यक्ष संतोष पवार, जगन ठाकरे, सोमनाथ पवार, विशाल मिरकुटे, सोमनाथ पपवा, एकनाथ भोईर, प्रितम मगर, भरत जाधव, अवि मगर, अनिकेत मिरकुटे, मनोज लोखंडे आदी सदस्य उपस्थित होते. 

अशा प्रकारचे उपक्रम यापुढे ही सतत राबवणार असल्याचे उदयनराजे सेना प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सागर तवले व बाळकडू पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष उमेश जाधव यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...