कल्याण डोंबिवलीत पेट्रोल पंपावर कर्मचारी करत आहेत कोरोनाचा प्रसार !
"महानगरपालिका व पोलिसांचे दुर्लक्ष"
कल्याण, रशीद शेख : संपूर्ण जगभरात तसेच देशात गेल्या दिड वर्षात कोरोनाने हाहाकार माजवला असून पहिली लाट, दुसरी लाट तसेच सरकारकडून वारंवार सांगीतले जात अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही आजही महाराष्ट्रात रोज दहा हजाराच्या आसपास रुग्ण भेटत आहेत. तिसरी लाट येण्याचा धोका सुध्दा असून सरकारने या कोरोना विरुद्ध लढण्यासाठी व नागरिकांचे जिव वाचवण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत लॉकडाऊन, जिल्ह्याबंदी, असे अनेक उपाय अंमलात आणले व मार्गदर्शक तत्वे (नियमावली) जाहीर केली त्यात मास्क वापरणे अत्यंत बंधनकारक केले ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव, प्रसार रोखण्यास मदत होते.
सरकारकडून उचलण्यात आलेल्या कठोर पावलांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला महाराष्ट्रात अजूनही दहा हजारांच ती आसपास रुग्ण आढळून येत आहेत. दोन महिन्यापूर्वी कल्याण डोंबिवली कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. आरोग्य विभागाने दिलेल्या गाईडलाइन्सनुसार आणखी काही काळ मास्क लावणे आवश्यक असणार आहे. असे असतांना मात्र कल्याण डोंबिवलीत पेट्रोल पंपा वर काम करनारे कर्मचारी नाका आणि तोंडावर नव्हे तर हनुवटीवर मास्क ठेवतात एवढेच नाही तर काही वीणा मास्क पेट्रोल भरत आहेत. त्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो जे अत्यंत धोकादायक असून यांच्या कडून कोरोनाचा प्रसार होत असण्याची शक्यता आहे.
सुरक्षेसाठी मास्क वापरलेच पाहिजे. जर तुम्ही कापडी मास्क वापरत असाल तर ते स्वच्छ धुवून त्याचा पुर्नवापर करता येतो. मास्क हे नेहमीच तोंंड आणि नाकावर असले पाहिजे. परंतु पेट्रोल पंप वर काम करनारे कर्मचारी यांच्या तोंडाला मास्क नव्हते कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप मालक व कर्मचाऱ्यांवर महानगरपालीका व पोलीस कधी कारवाई करनार.



No comments:
Post a Comment