वृक्ष संवर्धनासाठी चोपडा रोटरीतर्फे प्रताप शाळेत भूमिगत पाईप लाईन.!
चोपडा, वार्ताहर -
रोटरी क्लब चोपडा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये तालुक्यात अग्रेसर आहे, ते आरोग्य विषयी वा शैक्षणिक विषयी असो किंवा पर्यावरण संदर्भातली असून रोटरी क्लब चोपडाने आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे.
पर्यावरण विषयक रोटरी क्लब चोपडा नेहमीच जागरूक राहिलेली आहे मागच्या वर्षी एक जुलै रोजी बोरसे नगर येथे वृक्षारोपण करून नितीन अहिरराव यांनी आपल्या रोटरी अध्यक्षपदाची सुरुवात केली होती व त्यानंतर गणेश उत्सवा मध्ये सर्व गणेश मंडळांना "निर्माल्य कलेक्शन बॉक्स" देण्यात आले होते जेणेकरून निर्माल्य नदीत न जाता ते शेतात सेंद्रिय खत म्हणून उपयोगात आणण्यात आले, नदीत निर्माल्य न गेल्यामुळे वाटर पोलूशन ला आळा बसला त्याने समाजाकडून कौतुकही झाले होते, आणि आता रोटरी क्लब चोपडा कडून पर्यावरण पूरक असा एक उपक्रम चोपडा शहरातील प्रताप विद्या मंदिर या शाळेत, मुलांना पाणी पिण्यासाठी, वृक्ष संवर्धन, लावलेल्या रोपांना पाणी देण्यासाठी खेळाडूंना हात धुण्यासाठी तसेच गरजेनुसार क्रीडांगणावर पाणी मारण्यासाठी जेसीबि लाऊन भूमिगत पाण्याची पाईप लाईन करून देण्यात आली,ठिकठिकाणी नळ लाऊन व ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करून झाडांना जगवण्याचे काम सुध्धा आता सोपे होणार आहे. चोपडा रोटरीने केलेल्या या मदतीसाठी प्रताप विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री आर आर शिंदे सर यांनी आभार व्यक्त केले आहे.
सदर कार्यक्रमासाठी चोपडा रोटरी चे अध्यक्ष नितीन अहिरराव, मानद सचिव ॲड. रुपेश पाटील, प्रताप विद्या मंदिर संस्थेचे व रोटरीचे सदस्य श्री प्रफुल्लभाई गुजराथी,चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, प्रदीप पाटील, चेतन टाटिया तसेच मुख्याध्यापक श्री आर आर शिंदे, समन्वयक श्री गोविंदभाई गुजराथी, उपमुख्याध्याक श्री जी वाय वाणी, श्री जे एस शेलार, पर्यवेक्षक श्री एस जी डोंगरे, पी एस गुजराथी, श्रीमती एम डब्ल्यू पाटील, श्री डी टी महाजन व इतर सर्व शिक्षक बंधू- भगिनी कार्यक्रमास उपस्थित होते.



No comments:
Post a Comment