Saturday, 3 July 2021

सामाजिक कार्यकर्ते महेश ऐगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर आयोजन ! "२६४ आदिवासी व आश्रमातील २५ बालकांनी घेतला शिबीरचा लाभ" "आदिवासी बहिणीला वाढदिवसानिमित्त मंगळसूत्र भेट"

सामाजिक कार्यकर्ते महेश ऐगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर आयोजन !

"२६४ आदिवासी व आश्रमातील २५ बालकांनी घेतला शिबीरचा लाभ" "आदिवासी बहिणीला वाढदिवसानिमित्त मंगळसूत्र भेट"


टिटवाळा, उमेश जाधव-: टिटवाळा येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते महेश ऐगडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कल्याण तालुक्यातील म्हस्कल येथे आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. याचा लाभ येथील २६४ आदिवासीं व पारस बाल आश्रमातील २५ बालकांनी घेतला. यावेळी ऐगडे यांनी एका आदिवासी महिलेला मंगळसूत्र देखील भेट दिले.


सतत काही ना काही समाज कार्य करणे, गोरं गरीबांना मदतीचा हात देणे, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्याला नेहमी सहकार्य करणे, विविध समाजोपयोगी कार्यक्रम, शिबीरांचे आयोजन करणे ही महेश ऐगडे यांची खुबी बनली आहे. कोरोना काळात अनेकांना मदतीचा हात दिला. 


या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील म्हस्कल गावातील आदिवासी वाडीतील लोकांसाठी शनिवार आपल्या वाढदिवशी ऐगडे यांनी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिराचा लाभ येथील २६४ आदिवासींनी व पारस आश्रमातील २५ बालकांनी घेतला. यावेळी महिला, पुरूष व लहान बालके यांच्या विविध तपासण्या केल्या व त्यांना गोळ्या, औषधे देखील देण्यात आली. डाॅ. अनुदुर्ग ढोणी (एम बीबीएस डीजीओ, एमडी), स्त्री रोग तज्ञ डाॅ. उज्वला ढोणी (एमएएमएस) गोल्ड मेडल प्राप्त, बाळरोगतज्ञ डॉ. राज जाधव व त्यांची टिम यांनी शिबिरासाठी काम पाहिले. तसेच या प्रसंगी महेश ऐगडे यांनी आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करता आदिवासी गरीब गरजू आदिवासी लोकांच्या करीता आरोग्य शिबीराचे आयोजन करून केले. तर एका आदिवासी बहिणीला ४ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र भेट दिले. तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप देखील केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अमोल आरू, अमोल पाटील, आकाश गुंजाळ, सुरंज सिंग, अशोक चौरे व वासुदेव वाघे यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...